अमरनाथ ढोले यांना राज्यस्तरीय शैक्षणिक सेवागौरव पुरस्कार जाहीर

कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, कोळा ता. सांगोला जि. सोलापूर येथे कार्यरत असलेले वरिष्ठ लिपीक श्री. अमरनाथ नंदकुमार ढोले यांना शिवसमर्थ प्रतिष्ठान, पुणे यांच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय शैक्षणिक सेवागौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि.०१/०६/२०२४ रोजी सायं. ०५.०० वाजता निळू फुले सभागृह, राष्ट्र सेवादल, साने गुरूजी स्मारक, पर्वती पायथा, सिंहगड रोड, पुणे ३० या ठिकाणी संपन्न होणार आहे.
या पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. रवींद्र धंगेकर (विद्यमान आमदार, कसबा मतदारसंघ) यांचे उपस्थितीत मा.श्री. प्रशांत कदम, मा. श्रीमती. अश्विनी कदम, श्री. सोपान चव्हाण, मा. श्री. शिवाजी खांडेकर (अध्यक्ष, शिवसमर्थ प्रतिष्ठान, पुणे) यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
या निवडीबदद्ल सां.ता.शि.प्र.मंडळ, सांगोला चे अध्यक्ष मा.श्री. प्रबुध्दचंद्र झपके सर, सां.ता.शि.प्र.मंडळ, सांगोला चे सर्व सदस्य पदाधिकारी, विद्यामंदिर परिवार, कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, कोळा चे मुख्याध्यापक श्री. लांडगे सर व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी स्टाफ, सांगोला तालुका शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.