sangola

फॅबटेक फार्मसी च्या ०९ विद्यार्थ्यांची विरको बायोटेक हैद्राबाद मध्ये निवड

HTML img Tag Simply Easy Learning    

सांगोला येथील फॅबटेक शिक्षण संस्था संचलित फॅबटेक औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता विरको बायोटेक हैद्राबाद यांच्यातर्फे प्लेसमेंट ड्राइव्ह घेण्यात आली. यामध्ये फॅबटेक फार्मसी च्या ०९ विद्यार्थ्यांची विरचो बायोटेक हैद्राबाद मध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी निवड झाली. श्री. पी रघुराम रेड्डी -असिस्टंट जनरल मॅनेजर एच आर, श्री. केशवर्धन रेड्डी – मॅनेजर मॅनुफॅक्चरींग, श्री. लिंगैया – डेपुटी मॅनेजर मॅनुफॅक्चरींग यांनी मुलांची लेखी परीक्षा व मुलाखत या माध्यमातून निवड केली. याकरिता जवळजवळ ५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी करून मुलाखत दिली.

      याकरिता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. भाऊसाहेब रुपनर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर व परिसर संचालक डॉ. संजय अदाटे यांनी प्राचार्य डॉ. संजय बैस यांचे अभिनंदन केले. सदर कॅम्पस इंटरव्यू घेण्यात प्रा. श्रीनिवास माने व प्रा. चेतन पतंगे यांचे सहकार्य लाभले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!