फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचालित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेजमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील, सुपरवायजर सौ. वनिता बाबर , यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यात आले.
ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो, अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर. सर्वधर्मसमभाव अस्पृश्यता उच्चाटन सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता,गोरगरिबांविषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड, मूल दत्तक वारसाहक्क, प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाजसुधारकांचे कृतिशील कार्य करणाऱ्या अशा या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचे कार्य महान आहे.
फॅबटेक संस्थेचे अध्यक्ष श्री. भाऊसाहेब रुपनर, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अमित रुपनर, संस्थेचे कार्यकारी संचालक दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, शाळेचे प्राचार्य श्री.सिकंदर पाटील यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.संजय देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.