सांगोला महाविदयालयात श्री. रमेश बुंजकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार संपन्न

सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ संचलित, सांगोला महाविदयालयातील प्रयोगशाळा परिचर श्री. रमेश बसवेश्वर बुंजकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त शुक्रवार दि.31/5/2024 रोजी सपत्नीक सत्कार सोहळा संपन्न् झाला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष प्रा.पी.सी.झपके, संस्था पदाधिकारी मा.ॲड. उदय घोंगडे, श्री. शामराव लांडगे, श्री. सुरेश फुले, श्री.चंद्रशेखर अंकलगी, श्री.बाजीराव घाडगे, सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.विजयकुमार जाधव, डॉ.बी.एच.कुलकर्णी, प्रा.भारत लोंढे, प्रा.बी.एस.खडतरे तसेच प्रशासकीय सेवक श्री.एन.एस.सुरवसे, श्री.अशोक खडतरे, श्री. मधुकर कसबे यांचेसह महाविदयालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, बुंजकर परिवार आणि नातेवाईक उपस्थित होते. यावेळी श्री. रमेश बुंजकर यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना संस्थेमध्ये सेवा करण्याची संधी मिळाल्याबदद्ल सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे आभार मानले.
प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी केले, यावेळी अध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष प्रा.पी.सी.झपके, डॉ. राम पवार, प्रा.भारत लोंढे, अधिक्षक श्री. प्रकाश शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.संतोष कांबळे यांनी केले. आभार डॉ. अर्जुन मासाळ यांनी मानले.