पाचेगांव खुर्द ग्रामपंचयतीमध्ये अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी
ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पडली पारः ग्रामसभेत नलवडेवाडीच्या रस्त्याच्या मुद्दा गाजला

काल शुक्रवार दि. 31 मे रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती पाचेगांव खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी गावचे प्रथम नागरीक बिनविरोध सरपंच संगिता संजय भोसले यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व पुष्पहार अर्पण करुन जयंती साजरी करण्यात आली.
त्यानंतर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. हि ग्रामसभा सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या ग्रामसभेसाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते. विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व गावातील रखडलेल्या विकासकामांबाबतही चर्चा करण्यात आली व त्यावर लवकारात लवकर उपाययोजना करण्याच्या सुचना करण्यात आल्या.
त्यानंतर गेली अनेक वर्ष रखडलेल्या पाचेगांव खुर्द ते नलवडेवाडी रस्त्याच्या प्रश्नावरून स्थानिक रहिवाशी यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे सदस्य यांना चांगलेच धारेवर धरले. लवकरात लवकर या रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत पाठपुरावा करुन काम चालू न केलेस आंदोलन करण्यात येईल असा इशाराही उपस्थित नागरीकांतुन देण्यात आला. या रस्त्यामुळे नागरीकांमध्ये संतापाची लाट असल्याची चर्चा चालू आहे. त्यामुळे यावेळीची ग्रामसभा नलवडेवाडी रस्त्याचा मुद्दा घेवून चांगलीच गाजली.
यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमासाठी व ग्रामसभेसाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य, आषा वर्कर यांच्यासह स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.