sangola

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची शिकवण राज्यकर्त्यांसाठी दिशादर्शक ; मा. आम दिपकआबा साळुंखे पाटील

धनगर समाजातील गरजू विद्यार्थिनींसाठी दिपकआबाकडून धनगर समाज सेवा मंडळास एक लाख एक हजारांची देणगी 

HTML img Tag Simply Easy Learning    
 शेकडो वर्षांपूर्वी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी राजकारभार कसा करावा याचा मापदंड घालून दिला आहे. अहिल्यादेवींनी दिलेली शिकवण आजच्या राज्यकर्त्यांनीही आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले. शुक्र. दि ३१ मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीदिनी राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन करताना ते बोलत होते.
यावेळी धनगर समाज सेवा मंडळाच्या वतीने अध्यक्ष दिलीप जानकर यांच्याहस्ते मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दिलीप मस्के, दत्तात्रय जानकर, दिलीप जानकर, कशिलिंग गावडे, बापुसो ठोकळे, रविराज मस्के, निशांत मिसाळ, रवी चौगुले, अजिंक्य माने, म्हाळाप्पा शिंगाडे, आकाश व्हटे, संदीप कोळेकर आदीसह धनगर समाज सेवा मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दरबारात कधीही कुणावर अन्याय झाला नाही. राज्यातील सामान्य जनतेला रोजगार मिळावा म्हणून त्यांनी त्याकाळी औद्योगिक धोरण अवलंबिले होते. त्याचबरोबर त्यांनी आपल्या काळात हजारो हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला व हिंदू देवदेवतांना पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून दिले. प्रत्येक क्षेत्रात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांच्याच विचारांवर आजच्या राज्यकर्त्यांनी चालले पाहिजे असेही शेवटी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नमूद केले. यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, माजी नगरसेवक आलमगिर मुल्ला, महादेव कांबळे, चंचल बनसोडे, विनोद रणदिवे, अभिजित कांबळे, रवी कांबळे, शिवाजी इंगोले, सचिन पाटणे, देवराज लोखंडे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
धनगर समाजातील गोरगरिबांच्या मुली शिकल्या पाहिजेत असा आग्रह धरत समाजातील गरीब परिवारात जन्म घेतलेली एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील यांनी एक लाख एक हजार रुपयांची देणगी धनगर समाज सेवा मंडळाला दिली. तसेच धनगर समाजातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी यापुढे कसलीही गरज भासल्यास सगळ्यात आधी आपण मदतीसाठी तत्पर राहू असे वचनही यावेळी धनगर समाज सेवा मंडळास आणि धनगर समाज बांधवांना मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिले.
HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!