फॅबटेक मध्ये उद्या पासून प्रथम वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या प्रवेशासाठी कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरुवात*

फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या प्रवेशासाठी कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया शनिवार दि. २८ जुन २०२५ पासून सुरु झाली असून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयाला
फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी. ०६७५६) म्हणून मान्यताही मिळालेली आहे. ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया शनिवार २८ जुलै २०२५ ते दि. ८ जुलै २०२५ (सायं. ५.०० वाजेपर्यंत) चालणार आहे. अशी माहिती फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे सचिव डाॅ. अमित रूपनर यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. फॅबटेक अभियांत्रिकी मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, स्कॅन केलेली मूळ कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश आहे. प्रथम वर्ष प्रवेशासाठी ही प्रक्रिया दि. २८ जून २०२५ पासून दि. ८ जुलै २०२५ पर्यत (सायं. ५.०० वाजेपर्यंत) चालणार आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेशासंदर्भात दिनांक २८ जून २०२५ ते दि. ९ जुलै २०२५ अर्ज फार्म कागदपत्रांची पडताळणी आणि पुष्टीकरण करता येणार आहे.
विद्यार्थ्यांना दि. १३ जुलै २०२५ ते दि. १५ जुलै २०२५ या कालावधीत तक्रारी सादर करता येणार आहेत.
दिनांक १७ जुलै २०२५ रोजी विद्यार्थ्यांची महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येणार आहे
यामध्ये दि. ८ जुलै २०२५ नंतर नोंदणीकृत अर्ज नाॅन-कॅप जागेसाठी विचारात घेतलेले जाणार आहेत. दि. ९ जुलै २०२५ नंतर स्क्रुटनी सेंटर/फॅसिलिटी सेंटरने पुष्टी केलेले अर्ज फक्त नाॅन-कॅप जागेसाठी विचारात घेतले जाणार आहेत.
विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन साठी येताना आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे घेऊन यावीत तसेच सीईटी परीक्षेसाठी रजिस्टर केलेला मोबाइल नंबर सोबत असावा.
प्रथम वर्ष अभियांञिकी प्रवेश प्रक्रिया हि फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.
अभियांत्रिकीच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया प्रमुख प्रा. राजकुमार गावडे (८४०८८८८५०४) तसेच प्रा. आशिष जोशी (९५११८५८३९७) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन फॅबटेक इंजिनिअरिंग काॅलेजच्या वतीने करण्यात आले आहे.



