नंदेश्वर ता मंगळवेढा येथील श्री बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.
यामध्ये १४ वर्षे वयोगटात मुलांमध्ये करण मोटे,श्रेयस मेटकरी,शुभम मेटकरी,ओंकार मोटे,प्रविण माळी,शंभू चौगुले, १७ वर्षे वयोगटात मुलांमध्ये गुरुनाथ खांडेकर,अनिल डांगे, अमोल कांबळे,गुलाब मोटे,शुभम शिंदे,गणेश शिंदे,आर्यन मेटकरी, शुभम कसबे १९ वर्षे वयोगटात मुलांमध्ये प्रज्वल नागणे,रोहित कांबळे,पृथ्वीराज जाधव,सद्गुरु मासाळ,दत्तात्रय पाटील,दिपक दोलतडे,चैतन्य कळकुंबे,
साहिल लोखंडे,अण्णा बंडगर, शुभम आळणुरे,संकेत घोगरे, ऋषिकेश आळणुरे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले तसेच मुलींमध्ये १४ वर्षे वयोगटात क्रांती कळकुंबे,सायली पाटील, श्रीदेवी गरंडे,सानिका मेटकरी, क्रांती कांबळे तसेच १७ वर्षे वयोगटात मुलींमध्ये स्वप्नाली गरंडे, सौंदर्या कळकुंबे,रूपाली डांगे,त्रिवेणी गरंडे,साक्षी गरंडे,
१९ वर्षे वयोगटात मुलींमध्ये पुनम हुलगे,स्नेहा कळकुंबे,साक्षी दोलतडे,साक्षी मेटकरी,मुस्कान शेख,पूजा टेंगले,दिक्षा मासाळ, वर्षा मोटे,सुभिक्षा गोरड या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे १०० मीटर धावणे,२०० मीटर धावणे,४०० मीटर धावणे,८०० मीटर धावणे,१५०० मीटर धावणे,३००० मीटर धावणे तसेच वैयक्तिक स्पर्धेत गोळा फेक,भालाफेक,लांब उडी, अडथळा शर्यत या स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवले असून यापैकी ३० विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांना प्रशालेचे श्री बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल एकमल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर बंडगर,गिरीश चौगुले,नवनाथ मेटकरी यांनी मार्गदर्शन केले असून यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज, प्राचार्य विठ्ठल एकमल्ली यांच्यासह श्री बाळकृष्ण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,सचिव,सभासद शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,पालक व ग्रामस्थांनी केले आहे.