सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोलाच्या अध्यक्षपदी डॉ.अनिकेत देशमुख यांची निवड

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोलाच्या अध्यक्षपदी डॉ. अनिकेत देशमुख यांची निवड करण्यात आली. तर संस्था उपाध्यक्षपदी श्री.रामचंद्र खटकाळे यांची तर संस्था सचिव पदी श्री विठ्ठलराव शिंदे सर यांची फेरनिवड करण्यात आली.
सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोलाच्या संस्था सदस्यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी संस्था सदस्य श्री.चंद्रकांतदादा देशमुख, श्री.बबनराव जानकर, प्रा. डॉ.अशोकराव शिंदे, प्रा दीपक खटकाळे, श्री अवधूत कुमठेकर,प्रा जयंत जानकर व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
या शैक्षणिक संस्थेची स्थापना 15 मे 1969 रोजी करण्यात आली. डॉ.गणपतराव देशमुख यांच्या प्रेरणेने या संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेचा मुख्य उद्देश तालुक्यातील व परिसरातील शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या मुलांना सर्वात कमी फी मध्ये उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे हा आहे.
याप्रसंगी बोलताना डॉ.अनिकेत देशमुख म्हणाले की, एवढ्या मोठ्या विस्तारीत शैक्षणिक संस्थेचे अध्यक्षपद भूषविणे हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे कारण ज्या संस्थेचे अध्यक्षपद डॉ.भाई गणपतरावजी देशमुख यांनी भूषवले ती उंची गाठणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. शैक्षणिक क्षेत्रामधील सध्याच्या सर्व आव्हानांना पेलून एका नवीन व्हिजनसह संस्था सर्वांना विश्वासात घेवून, सर्वांच्या सहकार्याने पुढे नेण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखवला. या निवडीबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.



