चोपडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

नाझरा(वार्ताहर):- सांगोला तालुक्यातील चोपडी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य दादासो बाबर उपसरपंच पोपट यादव, जालिंदर बाबर,मुख्याध्यापक केशव बाबर जनार्दन बाबर नेताजी बाबर , प्रशांत डोंगरे,अनिल जगदाळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आबा शेजाळ यांनी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व्यसनमुक्तीच्या संकल्पनेतून साजरी करूया असा संदेश दिला. यावेळी त्यांनी आपल्या विविध कविता सादर करून प्रबोधन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनाजी तोरणे यांनी केले.धम्मवंदना मुरलीधर तोरणे यांनी दिली.
यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर बाबर, भिकाजी बाबर व सिद्धी तोरणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व समाज बांधव व उपस्थितांसाठी अल्पोपहार श्रीमंत दामू तोरणे यांनी दिला.या कार्यक्रमाचे आभार रामचंद्र ढोबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजिंठा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.