जागतिक पर्यावरणदिनी राज्यातील हजारो शिक्षकाने केले वृक्षारोपण; शिक्षक शेख यांच्या वृक्षारोपण उपक्रमाचे राज्यभर कौतुक

सांगोला : पृथ्वीचे तापमान कमी व्हावे व पर्जन्यमान वाढावे यासाठी प्राथमिक शिक्षक खुशालद्दिन शेख जि.प.प्राथमिक शाळा सांगोलकर गवळीवस्ती (तरंगेवाडी) ता- सांगोला यांनी कार्यशाळेतील हजारो शिक्षकांना 5 जून जागतिक पर्यावरण दिनी हक्काचे कोणतेही वड, पिंपळ, चिंच, कडूलिंब, आंबा, जांभूळ, करंज यापैकी एक देशी झाड लावावे व मुलाप्रमाणे जतन करावे असे आवाहन केले होते.
शिक्षक शेख हे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी राज्यातील शिक्षकांना शैक्षणिक विडिओ निर्मितीच्या मोफत कार्यशाळा घेतात. त्यांच्या कार्यशाळेचा आतापर्यंत राज्यातील 50,000 शिक्षकांनी लाभ घेतला आहे.
शिक्षक शेख यांच्या झाड लावण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन राज्यातील हजारो शिक्षकाने जागतिक पर्यावरण दिनी 9700 देशी झाडे लावली. झाड लावण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी लकी ड्रॉ पद्धतीने 11 शिक्षकांना स्वखर्चातून ई-लर्निंग सॉफ्टवेअर बक्षीस जाहीर केले होते. त्यातील पुढील शिक्षकांना बक्षीस प्राप्त झाले.
टारझन बळवंत सुरजागडे जि. प.शाळा नवरगाव जिल्हा गडचिरोली, हिरा दत्तात्रय मोरे जि. प.शाळा कोव्हळा जिल्हा यवतमाळ, शिवाजी बापू जगताप सिद्धेश्वर विद्यालय यावली जिल्हा सोलापूर, विक्रम नाईकनवरे जि. प.शाळा मैंदवाडी जिल्हा बीड, वन्या टुक्या वळवी जि. प.शाळा धडगाव जिल्हा नंदूरबार, रुक्मिणी सुखदेव गवळी जि. प.शाळा सारोळा जिल्हा अहमदनगर, अर्चना दिगंबर तळणकर जि. प.शाळा मळगाव जिल्हा सिंधुदुर्ग, विलास रामदास साबळे जि.प.शाळा करोळ जिल्हा पालघर, शाहिना जबीन समशेर खान जि. प.हिंदी माध्यमिक शाळा कसा जिल्हा गोंदिया, लता सोनबा गोगावले महानगर पालिका शाळाक्र-25 कोंढवा जिल्हा पुणे, प्रोत्साहनपर बक्षीस काशिनाथ धोंडीराम तोडकर निवासी मूक बधिर विद्यालय गोकुंदा जिल्हा नांदेड यांना मिळाले.
लकी ड्रॉ पद्धतीने 11 पर्यावरण प्रेमी शिक्षकाची निवड प्राथमिक शिक्षक मुनीर बरूदवाले जि.प.शाळा वडापूर तालुका दक्षिण सोलापूर यांनी केली. शेख यांनी स्वता प्रथम 5 झाडे लावून राज्यातील शिक्षक यांना झाड लावायचे आवाहन करून हजारो झाडे पर्यावरण दिनी लावले त्याच्या उपक्रमाबद्दल राज्यभर शिक्षकातून कौतुक केले जात आहे.