नातेपुते ग्रामीण रूग्णालयातील एक्स रे तंत्रज्ञ पद रिक्त

नातेपुते ग्रामीण रूग्णालयात स्थानिक नागरिक व आसपासच्या खेड्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपचारास येतात नातेपुते गावामध्ये नागरिकांची लोकसंख्या मोठी असल्याने नातेपुते नगरपंचायत झाली आहे.त्यामुळे रूग्णालयामध्ये एक्स रे तंत्रज्ञ पद हे रिक्त असल्या कारणाने लोंकाचे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे त्यामुळे नागरिकांचे खाजगी दवाखान्यामध्ये जादा पैसे आकाराले जातात म्हणून नातेपुते ग्रामीण रूग्णालयामध्ये एक्स रे तंत्रज्ञ पद हे तात्काळ भरावे व नागरिकांची गैरसोय टाळावी यासाठी डाॕ बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था व फुले शाहु आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे व नातेपुते ग्रामीण रूग्णालयास निवेदन देण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिक्षक डाॕ नम्रता व्होरा डाॕ शिवाजी शेंडगे,विशाल साळवे,सागर बिचुकले,प्रेम देवकाते,गणेश जाधव ,अनिल लांडगे,अमित सपकाळ,राजु सोनवळ,आकाश लोणारी,मोहीत सोरटे,तुषार लंबाते,नाना गायकवाड व इतर कार्येकर्ते उपस्थित होते .