महाराष्ट्रसांगोला तालुका

सांगोला शहरात नगरपरिषदेमार्फत मोकाट श्वानावर नसबंदीची प्रक्रिया सुरू …..

आत्तापर्यंत शंभर श्वानावर केली नसबंदीची शस्त्रक्रिया...*

सांगोला(तालुका प्रतिनिधी) पुणे येथील श्वान पथकाकडून सांगोला शहरातील आत्तापर्यंत सुमारे १०० मोकाट व भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी केल्यानंतर कुत्र्यांना वॅक्सिन ( लस ) देऊन तीन दिवसांनी पुन्हा ज्याठिकाणी पकडले त्याच ठिकाणी सोडून दिले असल्याचे युनिव्हर्सल ऍनिमल वेल्फेअर सोसायटीचे डॉ. सर्वेश पटेल यांनी सांगितले.
      सांगोला शहर व उपनगरात मोठ्या संख्येने मोकाट व भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार वावर वाढला आहे.सदरची भटकी कुत्री नागरिक, महिला, अबालवृद्ध, लहान मुलांवर अचानक हल्ला करून अनेकांना चावा घेवून जख्मीं केल्याच्या घटना घडल्या होत्या तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या दुचाकी स्वरांना कुत्री आडवी गेल्याने अपघात होऊन या अपघातात अनेक जण जायबंदी झाले होते भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती त्यानुसार सांगोला नगरपरिषदेकडून पुणे येथील युनिव्हर्सल अँनिमल वेलफेअर सोसायटी यांचेशी पत्रव्यवहार केला होता.त्यानुसार मागील आठवड्यापासून  डायब्रर प्लस खेचर इक्राम अन्सारी यांच्या पथकामार्फत सांगोला शहरात मोकाट व भटकी कुत्री पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे
नगरपरिषद सर्वेनुसार सांगोला शहर परिसरात सुमारे ५०० भटकी कुत्री असल्याचे निदर्शनास आले आहे या पथकाने आत्तापर्यंत सांगोला शहरात सर्वत्र फिरून सुमारे १०० मोकाट व भटकी कुत्री पकडून त्यांची नसबंदीची मोहीम उघडली आहे.पकडलेली कुत्री सांगोला नगरपरिषदेच्या एका हाॅलमध्ये तीन दिवस ठेवली जातात. श्वानाची परिस्थिती पाहून त्याच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया केली जाते त्यांना या तीन दिवसात अंडी व इतर सकस आहार दिला जातो, जी कुत्री आजारी आहेत अशांवर वैद्यकीय उपचार सुध्दा केले जात आहेत.सदरची मोहीम महिनाभर चालणार असल्याचे इक्राम अन्सारी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!