एस.एस.सी.1972 बॅचच्या गेट टुगेदरची नियोजन बैठक संपन्न

सांगोला – सांगोला विद्यामंदिर प्रशालेतून जे विद्यार्थी 1972 साली एस.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत,अशा वर्गमित्र व मैत्रिणीचा स्नेहमेळावा म्हणजेच गेट टुगेदर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.त्यानुसार नियोजनाची बैठक शुक्रवार दिनांक 14 जून रोजी श्रीकांत घोंगडे यांच्या हॉटेल मध्ये संपन्न झाली.
या बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन,रूपरेषा,ठिकाण व वेळ यावर साधक बाधक चर्चा करण्यात आली.या वेळी सांगोला विद्यामंदिर ज्यु.कॉलेज मधिल सेवानिवृत्त अध्यापक प्रा.राजाभाऊ ठोंबरे यांना निमंत्रित करण्यात आले होते.सर्वांच्या चर्चेने कार्यक्रमाची कच्ची रूपरेषा व कार्यक्रम पत्रिका तयार करण्यात आली.त्या नंतर सांगोला शहरातील सदानंद हॉटेल व जयनिला या दोन ठिकाणी भेट देवून कार्यक्रमासाठी कोणते ठिकाण योग्य होईल याची पाहणी करण्यात आली.
सर्वानुमते दिनांक 25 जून ते 5 जुलै या दरम्यानची तारीख निश्चित करून तारीख व ठिकाण कळविण्यात येईल. प्रा.राजाभाऊ ठोंबरे हे एस.एस.सी.1975, दहावी नवीन पहिल्या बॅचचे विद्यार्थी असून त्यांनी अनेक गेट टुगेदर सांगोला व अन्यत्र घेतले आहेत.सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील 1975 नवी,1975 जुनी बॅच,1974,1971,1969,1967 या एस.एस.सी.बॅच बरोबर त्यांनी त्यांच्या बी. एस्सी -1980, एम. एसी -1983, नातेपुते येथील त्यांच्या सुरुवातीच्या शाळेतील म्हणजेच दाते प्रश्नाला,नातेपुते येथील सेवानिवृत्त शिक्षकांचे गेट टुगेदर घेतले आहे.त्या मुळे त्यांना सांगोला मित्रांनी स्टार ऑफ द गेट टुगेदर हा पुरस्कार देवून सन्मानित केले आहे.तसेच मागील महिन्यात त्यांना ज्येष्ठ नागरिकांचे गेट टुगेदर घेतले म्हणून नेशनल एक्सलनस अवार्ड हा पुरस्कार कराड येथील पलपब संस्थेने दिला आहे.या बैठकीस हाजी बशीरभाई तांबोळी,जगन्नाथ गोडसे,श्रीरंग माळी,विष्णू गोडसे,श्रीकांत घोंगडे,श्रीरंग राऊत,दादासाहेब खडतरे,नानासाहेब होनराव,नाना पैलवान,महादेव जाधव,सदाशिव येडगे,उपस्थित होते