सांगोला तालुक्यात पहिल्याच दिवशी इ.१ ली नवागतांचे स्वागत गुलाब पुष्प देवून मिठाई वाटून करण्यात येणार
सांगोला- उन्हाळीच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर येत्या शनिवार १५ जून पासून सांगोला शहर व तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळांसह माध्यमिक शाळेची घंटा वाजणार आहे.या पार्श्वभूमीवर बुधवार १२ जून पासून शाळा पुर्व तयारीसाठी मुख्याध्यापक,शिक्षक आपापल्या शाळांवर दाखल झाले आहेत.दोन दिवसात शाळांसह परिसरात स्वच्छता साफसफाईसह शाळांना रंगरंगोटी करून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारीला लागले आहेत दरम्यान शाळेची घंटा शनिवारी वाजल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवार सुट्टी व सोमवार १७ जून रोजी बकरी ईद निमित्त शाळेस सार्वजनिक सुट्टी असणार आहे त्यामुळे मंगळवार १८ जून पासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष येत्या १५ जून सुरू होत आहे.त्याअनुषंगाने सांगोला पंचायत शिक्षण विभाग तयारीला लागले आहेत.
शाळेच्या पहिल्याच दिवशी शनिवारी ‘ समग्र शिक्षा अभियानांतर्गत सांगोला तालुक्यातील झेडपीच्या सुमारे ३८४ शाळांसह माध्यमिक, इंग्लिश मीडियम विनाअनुदानित १८४ शाळेतील इ.१ली ते ५ वी व इ.६ वी ते ८ वी.पर्यतच्या विद्यार्थ्यांना ३७,४२० मराठी,सेमी व उर्दू माध्यमाची मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत.
सांगोला शिक्षण विभागाकडून तालुक्यातील केंद्रस्तरावर पाठ्यपुस्तके पाठवले असून, शाळा स्तरांवर पोहच केली आहेत.शाळेच्या पहिल्याच दिवशी इ.१ ली नवागतांचे स्वागत गुलाब पुष्प देवून मिठाई वाटून करण्यात येणार आहे.त्याचदिवशीविद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार आहेत तसेच शाळा व्यवस्थापन समिती, सभापती, उपसभापती, जि प.सदस्य , पंचायत समिती सदस्य,सरपंच, उपसरपंच मान्यवर आपापल्या गावातील शाळेत नवागतांचे स्वागत करणार आहेत