*फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये “जागतिक पर्यावरण दिन” साजरा*

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित ,फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेजमध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे प्राचार्य श्री.सिकंदर पाटील, पालक प्रतिनिधी श्री. मोहळकर, ए.ओ.वर्षा कोळेकर, सुपरवायझर सौ.वनिता बाबर हे लाभले.
हे लक्षात घेऊन दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. जागतिक पर्यावरण दिन साजरा करताना शाळेत पर्यावरण दिन अंतर्गत उपक्रम घेण्यात आले. इयत्ता पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनाचे चित्र देऊन रंग भरणे, हा उपक्रम घेण्यात आला. इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन या संदर्भातील चित्र काढून ते रंगवणे हा उपक्रम घेण्यात आला. तर इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना ‘आपले पर्यावरण, आपले भविष्य’ हा विषय देऊन पोस्टर बनवणे हा उपक्रम घेण्यात आला. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळेत लावण्यासाठी वेगवेगळ्या झाडांची रोपे आणली. इयत्ता सातवीतील युवराज काशीद, स्वयंम गाडे, आठवीतील सृष्टी सावंत,आदिती घाडगे या विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठीचे घोषवाक्य सांगितले. इयत्ता सातवीतील श्रेया जगताप, आठवितील मयुरेश राऊत ,साईराज जानकर यांनी पर्यावरण संवर्धनासंदर्भातील माहिती दिली. शाळेतील शिक्षक श्री.निसार इनामदार यांनी पर्यावरण संवर्धन संदर्भातील माहिती दिली.
या जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन शाळेचे प्राचार्य श्री.सिकंदर पाटील, पालक प्रतिनिधी श्री. मोहळकर,ए.ओ.वर्षा कोळेकर, सुपरवायझर सौ.वनिता बाबर यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. फरिदा मुलांनी यांनी केले. तर आभार सौ. भारती जुंधळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.संजय देशमुख यांचे सहकार्य लाभले.
फॅबटेक संस्थेचे अध्यक्ष श्री.भाऊसाहेब रुपनर, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अमित रुपनर, संस्थेचे कार्यकारी संचालक श्री.दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.