डेअरी डिप्लोमा कॉलेज कडलास यांच्या वतीने ‘शक्तीवर्धक दूध’ या विषयावर व्याख्यान. 

महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर व पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर येथील सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर नंदकुमार गायकवाड , समन्वयक डॉक्टर अनिल पाटील व संचालक विस्तार शिक्षण विभाग डॉक्टर अनिल भिकाने यांचे मार्गदर्शनाखाली रोप्य महोत्सवीय दुध दिन पंधरवड्याचे आयोजन पशुधन व्यवस्थापन व दूध उत्पादन पदविका विद्यालय कडलाच्या वतीने करण्यात आले होते
कडलास येथील अंगणवाडी केंद्रामध्ये कॉलेजचे प्राध्यापक व कर्मचारी यांनी उपस्थित अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली त्यानंतर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव भोसले  यांनी दूध व दूधजन्य पदार्थ यांचे महत्त्व तसेच बालक युवा वयोवृद्ध यांना दुधाची आवश्यकता याबाबत  माहिती सांगितली प्रत्येकाने आपल्या आहारात दुधाचा समावेश करावा असे आवाहन केले
या कार्यक्रमासाठी  डेअरी कॉलेजच्या प्रा.वैशाली दबडे, डॉ. अतुल फुले, प्रा.प्रणित वाघमारे ,प्रा.साईराज आहेरकर उपस्थित होते याप्रसंगी कडलास परिसरातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच बालक व पालक हजर होते कार्यक्रमाची प्रास्ताविक व आभार प्रा.त्रिंबक गायकवाड यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button