महाराष्ट्र
जि.प. जानकरमळा शाळेत इ. ४ थी निरोप समारंभ आणि इ.१ली स्वागत समारंभ संपन्न

जि. प. प्राथमिक शाळा जानकरमळा (शिवणे) येथे आज इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि इयत्ता पहिली दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य मा. श्री. सुब्राव बंडगर सर उपस्थित होते.
इयत्ता पहिली प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे स्वागत आणि इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने गुलाबपुष्प देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. प्रतिनिधिक स्वरूपात विद्यार्थी आणि पालक यांनी मनोगत व्यक्त केले. इयत्ता चौथीतील सर्व विद्यार्थ्यांतर्फे शाळेला मोठा वायरलेस स्पीकर भेट दिला. तसेच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. किरण प्रकाश वाघमोडे यांनी त्यांची कन्या कु. स्वरा हिच्या वाढदिवसानिमित्त शाळेला डायस भेट दिला. यानंतर राज्यस्तरीय ITSE प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी कु.आराध्या शशिकांत जानकर हिने राज्यात चौथा आणि इयत्ता पहिलीतील विद्यार्थी सोहम बापुसो सपताळे याने पाचवा क्रमांक मिळवल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मा. बंडगर सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी आणि उपस्थित पालकांशी संवाद साधत प्रेरणादायी विचार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी परिसरातील पालक बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थित असलेल्या सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांचे आभार व्यक्त करुन कार्यक्रम सपन्न झाला.



