जिल्हा परिषद शाळा मेडशिंगी येथे नवागतांचे स्वागत व शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न 

जिल्हा परिषद शाळा मेडशिंगी येथे आज दिनांक 15/6/24 रोजी शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिली मध्ये नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे  औक्षण करून व हार पुष्प गुच्छ देवून स्वागत करण्यात आले तसेच यावेळी गावातून प्रभात फेरी काढून  शाळा सुरू झाली आहे याची जाणीव सर्व गावकरी यांना देण्यात आली.
सर्व विद्यार्थ्यांना नविन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा सांगोला पंचायत समिती चे विस्तार अधिकारी श्री लक्ष्मी कांत कुमठेकर यांनी दिल्या संपूर्ण कार्यक्रमाचे योग्य असे नियोजन शाळेचे उपशिक्षक श्री चंद्रकांत बाबर सर यांनी केले तर संपूर्ण सहकार्य शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेश गडहिरे सर उपशिक्षक श्री महादेव कमळे गुरुजी आणि श्रीमती परवीन मुलाणी मैडम यांनी केले
सदर कार्यक्रमासाठी माता पालक गटाच्या सौ प्रियांका मागाडे सौ ज्योती राऊत सौ साळुंखे सौ शिंदे तसेच शिक्षण प्रेमी नागरिक श्री प्रभाकर कांबळे श्री अंकुश इंगवले श्री जगन्नाथ इंगवले आदी मान्यवर उपस्थित होते शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना गोड पदार्थ खाऊ म्हणून देण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेश गडहिरे सर यांनी शेवटी सर्वांचे मनापासून आभार मानले
2 Attachments • Scanned by Gmail

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button