भिमनगर येथील शाळेत  शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत समारंभ उत्साहात साजरा

सांगोला:-जि.प.प्रा.शाळा भिमनगर सांगोला येथे  दि.१५/६/२०२४ रोजी शाळा प्रवेशोत्सवाच्या प्रसंगी सांगोला केंद्राचे केंद्रप्रमुख मा.अस्लाम इनामदार व गटशिक्षणाधिकारीसुयोग नवले  उपस्थित होते.यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तद्नंतर उपस्थित मान्यवरांचे शाळेच्यावतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

गटशिक्षणाधिकारी मा.सुयोगजी नवले यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प, फुगे व क्रमिक पुस्तके देऊन करणेत आले.शैक्षणिक नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या. आयु.बापुसाहेब ठोकळे शा.व्य.स.शि प्रेमी यांनीही आपल्या मनोगतात शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर समाधान व्यक्त केले.तसेच सौ.विजयाताई बनसोडे शा.व्य.स स्था.प्रा.यांनी शाळेच्या शैक्षणिक अडचणी विषयी सविस्तर चर्चा केली.

कार्यक्रमाच्या वेळी  शा.व्य.स.अध्यक्षा  सौ.कोमल ठोकळे, माजी अध्यक्षा सौ.दिपाली गायकवाड तसेच सर्व सदस्य, सर्व पालक व ग्रामस्थ सौ मंजुषा बनसोडे, श्री.उमेश लोखंडे, श्री राकेश आठवले, सौ.अनिताताई काटे, अंगणवाडी सेविका जयंती ताई बनसोडे व लक्ष्मी बनसोडे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना श्री.जगताप सरांनी केली. सर्व विद्यार्थ्यांना शिरा, जिलेबी गोड गोड खाऊ दिला.आनंदायी वातावरणात प्रवेशोत्सव पार पडला.श्रीम.शेळके बाई यांनी सर्वाचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button