शासकीय धान्य गोडावुनमधील वाहनांचे पाटे चोरणार्या चोरट्यास अटक
सांगोला(प्रतिनिधी):-शासकीय धान्य गोडावुन येथील तहसीलदार यांच्या कब्जातील चारचाकी वाहनाचे लोखंडी पाटे चोरुन घेवुन जात असताना एका युवकास अटक करण्यात आली असल्याची घटना 13 जून रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास महात्मा फुले चौक ,सांगोला येथे घडली.
चोरीची फिर्याद कुमाररवि राजवाडे, तलाठी,सांगोला यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे. यावेळी 7 हजार रुपये किंमतीची चारचाकी वाहनांचे लोखंडी पाटे व 1 लाख 50 हजार रु. किंमतीची मिनी टेम्पो असा एकूण 1 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि. 13 जून 2024 रोजी रात्रौ 9.30 वाजणेचे सुमारास महात्मा फुले चौक सांगोला येथे एक पिवळ्या रंगाचा मिनी टॅम्पो पकडला. त्यावरील चालक लखन शिंदे याने मुद्दाम लबाडीने आमच्या समंत्ती शिवाय स्वताच्या फायद्याकरीता शासकीय धान्य गोडावुन सांगोला ता. सांगोला च्या पाठीमागे तहसीलदार यांच्या कब्जातील चारचाकी वाहनाचे लोखंडी पाटे हे चोरुन घेवुन जात असताना पोलीसांना मिळुन आला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.पुढील तपास पोना वाकीटोळ हे करीत आहेत.