पुजारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस गटशिक्षणाधिकारी यांची अचानक भेट
सांगोला:- सांगोला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले यांनी काल शनिवार दि.15 जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी पुजारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस अचानक भेट देवून पाहणी केली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुजारवाडी येथे इयत्ता पहिली प्रवेश उत्सव व नवगतांचे स्वागत करण्यात आले.यावेळी सांगोला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री सुयोग नवले व सांगोला केंद्राचे केंद्रप्रमुख इनामदार सर हे उपस्थित होते.
यावेळी पहिलीतील मुलांना पुस्तक फुगे, चॉकलेट, गुलाबपुष्प, जिलेबी ,शिरा देऊन त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी पालक वर्ग भरपूर संख्येने उपस्थित होता तसेच शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य हेही उपस्थित होते, तसेच पीएमश्री अंतर्गत इयत्ता पहिली वर्गाचे वर्ग रचना गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले यांच्याकडून पाहण्यात आली.