क्रांतीज्योती महिला नागरी सह. पतसंस्थेची सोमवारी 4 थी वार्षिक सर्वसाधारण सभा
सांगोला(प्रतिनिधी):-क्रांतीज्योती महिला नागरी सह. पतसंस्था सांगोला बनकरवाडी पतसंस्थेची 4 थी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि. 17 जून 2024 रोजी सकाळी 10.30 वा. हर्षदा लॉन्स् मिरज रोड, सांगोला येथे चेअरमन सौ. भाग्यश्री रामचंद्र बनकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली आहे.
मागील दि. 06/08/2023 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा कार्यवृतांत वाचुन कायम करणे., विषय नं. 2 दि. 31 मार्च 2024 रोजी संपणार्या वर्षाचे तेरीज पत्रक, नफा-तोटा पत्रक व ताळेबंद पत्रक वाचून मंजूरी घेणे., सन-2022-23 च्या नफा वाटणीस मंजुरी घेणे.,सन-2023-24 मध्ये अंदाज पत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चास मंजूरी देणे., सन 2024-25 सालासाठी तयार केलेले अंदाज पत्रकास मान्यता घेणे, सन 2023-24 सालचा वैधानिक लेखा परिक्षण अहवाल वाचून नोंद घेणे, मा. संचालक व त्यांचे नातेवाईक यांचेकडील थकित कर्जाबाकी बाबत विचार विनीमय करणे., सन 2022-2023 चा दोष दुरुस्ती अहवाल वाचुन नोंद घेणे. संस्थेची नविन शाखा विस्तार करणे बाबत चर्चा करणे., संस्था व्यवसाय वृद्धी करीता व वसुली करितां नवीन चार चाकी गाडी खरेदी करणे बाबत. सन 2024-2025 सालाकरिता वैधानिक लेखापरिक्षकाची नेमणुक करणेबाबत विचारविनिमय करणे. आदी सभेपुढील विषय असणार आहेत.
तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन सौ.भाग्यश्री रामचंद्र बनकर व व्यवस्थापक श्री. गणेश नारायण अनंतकवळी (माळी) यांनी केले आहे.