जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलवडी येथे नवागतांचे उत्साहात स्वागत

बलवडी:-नवीन शैक्षणिक वर्ष 2024 -25 सुरुवात 15 जून 2024 रोजी सर्वत्र उत्साहात आणि आनंदात करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलवडी येथे इयत्ता पहिली दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोहर पवार सर यांनी नवीन वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री बाळासाहेब खुळपे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ग्रामपंचायत सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री शिवाजी शिंदे, श्री चांगदेव शिंदे, श्री नवनाथ शिंदे, श्री वसंत राऊत, शिक्षक उपस्थित होते.
गावातून सर्व विद्यार्थ्यांची वाजत गाजत घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी विद्यार्थ्यांना वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री गोरखनाथ बनसोडे सर, सागर गुरव सर, विजयकुमार शिंदे सर, श्रीमती योगिता शांत मॅडम, श्रीमती स्वाती पाटील मॅडम, श्रीमती सोनल सावंत मॅडम यांनी परिश्रम घेतले. सर्वत्र आनंदी वातावरण होते.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. बलवडी शाळेतील शिक्षक श्री सागर गुरव सर यांनी सर्वांचे आभार मानले विद्यार्थ्यांना जेवणामध्ये मसाले भात व गोड पदार्थ शिरा देण्यात आला. अशाप्रकारे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात करण्यात आली.