आनंद विद्यालय कमलापूर येथे नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

2024 25 नवीन शैक्षणिक वर्षानुसार 15 जून 2024 शनिवार या दिवशी आनंदी विद्यालयामध्ये इयत्ता 5वी व इयत्ता 8 वी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले
स्वागतप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री आदलिंगे एन डी सर व सर्व शिक्षक हजर होते नवीन प्रवेशित घेतलेले विद्यार्थीचे स्वागत करताना प्रशालेचे सहशिक्षक श्री बनकर एम एच यांनीं पर्यावरणातला बदल कसा होत गेलेला आहे व पर्यावरणातला समतोल ठेवण्यासाठी प्रत्येकाने झाड लावलं पाहिजे झाडामुळे पर्यावरणाचा समतोल राहतो अशी सविस्तर माहिती या विद्यार्थ्यांना सांगितले गेले व सर्व विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड लावताना चे फोटो काढण्यास सांगितले
त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याला झाडाची किती वाढ झाली आहे हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक महिन्याला झाडाबरोबर फोटो काढून वर्गशिक्षकाला पाठवण्याचे सांगितले प्रशालेचे मुख्याध्यापक श्री आदलिंगे सर व सर्व शिक्षक यांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्याला बकुळीचे एक रोप देण्यात आले नवीन प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थीत्यानी फुगे फोडण्याचाआनंद घेतला व सर्व विद्यार्थ्यांना जिलेबीचे वाटप करण्यात आले आनंद विद्यालय मध्ये आनंदमय सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळेस सर्व शिक्षक हजर होते.