बाडमळा(लक्ष्मीनगर) येथील शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी

महूद, ता.१७ : सुरू झाली.. सुरू झाली… आमची शाळा सुरू झाली…. अशा प्रकारच्या घोषणा देत बाडमळा (लक्ष्मीनगर,ता.सांगोला)येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशीच प्रभात फेरी काढली.या शाळेत इयत्ता पहिलीला प्रवेश घेतलेल्या सर्व सात मुलींचे फेटा बांधून व औक्षण करून स्वागत करण्यात आले.
बाडमळा(लक्ष्मीनगर) येथील या कार्यक्रमास सरपंच राणी बाड,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा पूजा चव्हाण,सदस्य दीपक चव्हाण,पूनम पवार,मुख्याध्यापक सचिन चांडोले, बाबासाहेब इंगोले यांच्यासह व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन शैक्षणिक वर्षात या शाळेत पहिली मध्ये दाखल होणाऱ्या सर्व सात मुलीच आहेत.या मुलींचे फेटा बांधून, गुलाब पुष्प देऊन व औक्षण करून स्वागत करण्यात आले.शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना आंबे व शिरा असे मिष्ठान्न देण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.