सांगोला तालुक्यामधील महूद बु ,कोळा, जवळा, घेरडी, नाझरा येथे राजस्व अभियान राबवावे श्री मा.अतुल मालक पवार

सांगोला तालुक्यामधील महूद बु ,कोळा, जवळा, घेरडी, नाझरा येथे राजस्व अभियान राबवावे अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष श्री अतुल पवार यांनी तहसीलदार सांगोला यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सांगोला तालुक्यातील नागरिकांना व दहावी, इयत्ता बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक ऍडमिशन साठी जातीचे प्रमाणपत्र ,उत्पन्न व रहिवासी दाखला आर्थिक दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल तसेच इतर शैक्षणिक दाखल्याची आवश्यकता असते.
सदरचे दाखले विद्यार्थ्यांना कमी वेळेत मिळावे यासाठी सांगोला तहसील कार्यालयाने कोळा महूद बु जवळा घेरडी नाझरा येथे महाराजस्व अभियान शिबिर घेऊन या शिबिरांचा विद्यार्थ्यांना व पालकांना लाभ होईल तसेच आर्थिक त्रास ही सहन करावा लागणार नाही. तरी आपण वरील ठिकाणी ताबडतोब शिबिर घेऊन विद्यार्थी व पालकांना सहकार्य करावे. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.