सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी; लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाकडे गांभीर्याने पाहावे; पंकजा मुंडेंचा रोख कोणाकडे?

पंकजा मुंडे म्हणाल्या , लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पाहावे.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीसाठी जालना -वडीगोद्री येथे दाखल झाले आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन देण्याची हाकेंची मागणी आहे. मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, माजी केंद्रीयमंत्री भागवत कराड दाखल झाले आहेत.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीसाठी जालना -वडीगोद्री येथे दाखल झाले आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन देण्याची हाकेंची मागणी आहे.
अंतरवली सराटीच्या वेशीवर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकें आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांचे गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषण सुरूय. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देताना ओबीसी समाजाला (OBC) धक्का लागणार नाही याची लेखी हमी सरकारने द्यावी या मागणीसाठी हे आमरण उपोषण सुरू आहे. दरम्यान लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालावत चालली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडें यांनी ट्वीट केले आहे. तसेच समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. हाके यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी सरकारकडे केले आहे.
लक्ष्मण हाके यांच्या मागण्या काय?
- ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मूळ आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करू नये. तसे लेखी आश्वासन मुख्यमंत्री महोदयाकडून मिळाले पाहिजे.
- कुणबीच्या लाखो बोगस नोंदीची त्वरित दखल घेवून त्या रद्द करण्यात याव्यात.
- ओबीसीच्या आर्थिक विकास महामंडळाना आर्थिक तरतूद व्हावी.
- ओबीसीच्या वसतिगृहाची प्रत्येक जिल्हात योजना कार्यान्वित व्हावी.
- ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी
लक्ष्मण हाके काय म्हणाले?
लक्ष्मण हाके म्हणाले, आमची एकच विनंती एका बाजूला शासन आणि सर्वच पक्षाचे प्रमुख ओबीसीला धक्का लागणार नाही म्हणत आहेत. त्याचवेळी मनोज जरांगे आम्ही ओबीसी मराठा समाज घुसवला असं म्हणत आहेत. त्यामुळे ओबीसींच्या मनामध्ये चिंतेचे वातावरण ओबीसींना डावलल्याची भावना आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही तर कसा लागत नाही? आणि आत्ताच्या ज्या कुणबी नोंदी दिल्या जात आहेत. शासनाच्या संरक्षणमध्ये खाडाखाडी करून कुणबी नोंदी चे प्रमाणपत्र दिले जात आहेत, याच लेखी उत्तर सरकार ने द्यावे. आम्ही कोणत्याही जातीचा द्वेष करत नाही, आमचे शिष्टमंडळ उद्या मुबईला जाईल, पण ओबीसींना कसा धक्का लागत नाही हे सरकार ने सांगावे, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील.