healthsangola

तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ईसीजी मशीन उपलब्ध:-डॉ. अविनाश खांडेकर

हृदयरोग आजारावर प्राथमिक आरोग्य केंद्रात होणार निदान

HTML img Tag Simply Easy Learning    

सांगोला:-हृदयरोग आजारासंबंधी कोणतीही तक्रार आसल्यास आता प्राथमिक आरोग्य केंद्रात अगदी मोफत उपचार होणार आहेत. त्या अनुषंगाने सांगोला तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एसीजी मशीन उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार केवळ दहा मिनिटांमध्ये आजारासंबंधी माहिती अर्थात हृदयाचा अहवाल रुग्णालयात उपलब्ध होणार असल्याने हृदयविकाराच्या विविध आजारासंबंधी मोफत शस्त्रक्रिया आता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश खांडेकर यांनी दिली आहे.

हृदयासंबंधीत आजारावर अनेकदा गोरगरीब रुग्णांना आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे व शहरी भागात ये जा करणे परवडत नसल्याने, उपचाराअभावी राहावे लागत होते. परंतु आता आपल्याच सांगोल्यात 6 प्राथमिक आरोग्य केंद्रात हृदयविकारासंदर्भात उपचाराची सोय झाली आहे. तेही अगदी मोफत उपचार होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या स्टेमी प्रकल्पामुळे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एसीजी मशीन उपलब्ध झाले आहेत. या मशीन द्वारे केवळ दहा मिनिटांमध्ये हृदयासंबंधीच्या आजारावर निदान करणे शक्य होणार आहे. सदरच्या मशीन प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर पोहोच झाल्या आहेत. याबाबत डॉक्टरांना त्या संबंधित माहिती देण्यात आली असून, या मशीन द्वारे अचूक निदान केले जाणार आहे. यानिमित्ताने हृदयरोग आजारावरील रुग्णांची आता आपल्याच गावात तेही मोफत सोय झाली आहे.

हृदयरोगाचा झटका आल्यानंतर त्याची लक्षणे कशी ओळखावी व त्यावरील उपचार वेळेत घ्यावेत यासाठी ईसीजी मशीन अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. निश्चितपणे हृदयरोगाने होणार्‍या मृत्यूचे प्रमाण कमी होणार आहे. असेही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर यांनी सांगितले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!