वंचित पशुपालकांना दुधाचे वाढीव अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा ; राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद

मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी घेतली ना राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट

 

राज्य सरकारने दुधाला जाहीर केलेले प्रतिलिटर ५ रुपयांचे अनुदानापासून वंचित असणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यांना आता वाढीव ५ रुपयांचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी याबाबत नुकतीच मुंबई येथे राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. या बैठकीत राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वंचित पशुपालकांना अधिकचे अनुदान देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.

सांगोला तालुक्यातील घेरडी, पारे हंगीरगे सह अन्य गावात पशुपालक शेतकऱ्यांनी किंवा दूध उत्पादक संस्थांनी अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक ऑनलाइन माहिती भरली होती. परंतु, सदरची माहिती चुकीची असल्याचे सांगून ती दुरुस्त करण्याच्या सूचना दूध उत्पादक संस्थांना देण्यात आल्या होत्या. दूध उत्पादक शेतकऱ्यांची दुरुस्त माहिती शासनाला सादर करूनही सांगोला तालुक्यातील हजारो दूध उत्पादक शेतकरी प्रति लिटर ५ रुपयांच्या वाढीव अनुदानापासून वंचित राहिले होते. याबाबत सांगोला तालुक्यातील दूध उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांना भेटून आपल्या मागणीची लेखी निवेदन दिले होते. तालुक्यातील हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर तात्काळ राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन दिपकआबांनी या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय देण्याची विनंती ना. विखे पाटील यांना केली यावर राधाकृष्ण विखे पाटलांनी सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारच्या आगामी बैठकीत यावर तोडगा काढण्याची आश्वासन दिले.

राज्यभर दुधाचे दर कमालीचे घसरल्याने पशुपालक शेतकरी आर्थिक अडचणीत आला होता. अशावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी राज्यात सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली होती. पशुपालक शेतकऱ्यांच्या या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच राज्य सरकारने पशुपालक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता. या अनुदानापासून वंचित असणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही आता राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्र्वस्त केल्याने सांगोला तालुक्यातील पशुपालक शेतकरी सुखावला आहे.

राज्यातील दूध उत्पादक शेतकरी दुधाचे दर घटल्याने अडचणीत आला होता. शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडत असल्याचे लक्षात आल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे ही मागणी सर्वप्रथम सांगोला तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली होती. त्यामुळे खऱ्या अर्थाने राज्यातील पशुपालक व दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रु. याप्रमाणे वाढीव अनुदानाचा लाभ मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button