कोळा महसूल मंडळात तहसील कार्यालयाच्या वतीने दाखले वाटप शिबिर संपन्न…

कोळा वार्ताहर
सांगोला तहसील विभागाच्या वतीने मंडळ अधिकारी कार्यालय कोळा यांच्या नियोजनाखाली कोळा विभागातील शासनाच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने निराधार तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशाकरिता आवश्यक विविध दाखले उपलब्ध करून देणेकरीता शिबीर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये जवळपास १८६ नागरिकांनी सहभाग नोंदवला कोळा मंडल अधिकारी यांच्या वतीने दाखले वितरण करण्यात आले.
कोळा ता ग्रामपंचायत कार्यालय येथे महसूल विभागाच्या वतीने विशेष दाखले देण्याचे शिबिर आयोजित केले होते यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिरास कोळा कराडवाडी कोंबडवाडी तिप्पेहळी किडेबिसरी पाचेगाव बु गौडवाडी सोमेवाडी जुनोनी काळूबाळूवाडी या गावातील नागरिकांनी सहभागी होऊन उपस्थित लावली होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांगोला निवासी नायब तहसीलदार साळुंखे साहेब कोळा विभागाचे सर्कल गणेश गोरख टिके कोळे कराडवाडी कोंबडवाडी गाव कामगार तलाठी योगेश बोदमवाड पाचेगाव बुद्रुक तलाठी मधु वाघमोडे गौडवाडी तलाठी संभाजी जाधव,तिप्पेहळी तलाठी कोमल दौंड, जुनोनी तलाठी अर्चना सांगोलकर,कराडवाडी तलाठी मयुरी साळुंखे यांनी परिश्रम घेतले. शासनाच्या वतीने ग्रामीण भागात आयोजित केलेल्या शिबिरास ग्रामस्थांनी प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
सध्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी दाखल्यांची कोणतीही अडचण येऊ नये म्हणून प्रत्येक तालुक्यात मंडल स्तरावर विशेष कॅम्प घेतले जात आहेत. त्या अनुषंगाने कोळा विभागात दाखले मिळवण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन सांगोला तहसील यांच्यावतीने करण्यात आले होते यामध्ये १८६ विद्यार्थी विद्यार्थ्यांनी व पालकांनी सहभाग नोंदवल आहे.
~ योगेश बोदमवाड, तलाठी कोळा