*सांगोला नगरपरिषदेने सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करणेसाठी महिला बचत गटांकरिता केले विविध प्रशिक्षणाचे आयोजन.

सांगोला नगरपरिषद राबवीत असलेलल्या केंद्रशासन पुरस्कृत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) या योजनेंतर्गत महिला सशक्तीकरण व त्यांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम घेतले जातात. या अनुषंगाने सांगोला शहरामध्ये २०० पेक्षा अधिक स्वयंसहाय्यता महिला बचत गट स्थापन करण्यात आलेले आहेत. बचत गटांना अंतर्गत कर्ज व्यवहारासाठी नगरपरिषदेच्या वतीने र.रु. १००००/- इतका फिरता निधी अनुदान म्हणून दिला जातो. त्याच प्रमाणे ज्या बचत गटांना स्थापन होऊन सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला असेल अशां बचत गटांना बँकेचे सवलतीच्या व्याज दराने नगरपरिषदे अंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. आज पर्यत शहरातील विविध गटांना साधारण २.५ कोटी पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यातून बचत गटातील महिला या आर्थिक दृष्ट्या सक्षम होत आहेत.
या अनुषंगाने सांगोला नगरपरिषदेकडून स्थापन करण्यात आलेल्या नवीन बचत गट भविष्यात व्यवस्थित प्रगती करण्याच्या दृष्टीने त्यांना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत विविध प्रशिक्षण दिली जातात. यामध्ये बचत गट संकल्पना प्रशिक्षण, वस्तीस्तर संघ व शहरस्तर संघ संकल्पना प्रशिक्षण, लेखा १ व २ प्रशिक्षण व नेतृत्व विकास प्रशिक्षण दिले जाते. डॉ.सुधीर गवळी, मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद सांगोला यांच्या मार्गदर्शनाखाली गेली एक ते दोन महिन्यामध्ये स्थापन करण्यात आलेल्या १५ बचत गटांना बचत गट संकल्पना प्रशिक्षण सांगोला नगरपरिषदेच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून मानदेश फौंडेशनच्या श्रीम. अर्चना खर्चे व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाच्या सहयोगिनी श्रीम.मीनाक्षी वेळापुरे यांनी अनुक्रमे दि. १९ व २० जून रोजी प्रशिक्षण घेतले. सदरचे बचत गट संकल्पना प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन नगरपरिषदेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कक्षाकडून करण्यात आले.
आज सांगोला शहराध्ये साधारण २०० बचत गटाच्या माध्यमातून २००० पेक्षा अधिक महिला या राष्ट्रीय नागरी उपजीविका आभियानाशी जोडल्या गेलेल्या आहेत. सर्व बचत गट आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम होण्याच्याकरिता नगरपरिषदेच्या माध्यामतून विविध प्रशिक्षण देण्यात येत. आज शहरातील विविध महिला बचत गटांना बँकेच्या माध्यामतून सवलतीच्या व्याज दारामध्ये २.५ कोटी पेक्षा जास्त कर्ज उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा नगरपरिषदेच्या माध्यामतून प्रयत्न केला जात आहे.
*डॉ. सुधीर गवळी*
*मुख्याधिकारी तथा प्रशासक*
*नगरपरिषद सांगोला*