जवळे(प्रशांत चव्हाण) जवळे येथील श्री.चंद्रकांत नानासाहेब देशमुख यांचे चिरंजीव स्वर्गीय दादासाहेब देशमुख यांची सहावी पुण्यतिथी मंगळवार दिनांक 8एप्रिल 2025 रोजी देशमुख नगर येथील त्यांच्या निवासस्थानी साजरी करण्यात आली.याप्रसंगी दुपारी 12 वाजता स्व.दादासाहेब देशमुख यांचे चिरंजीव अर्जुन सिंह यांच्या हस्ते पूजा विधी करून फुले टाकण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. तत्पूर्वी जवळे येथील श्री.नारायणदेव पुरुष भजनी मंडळ यांनी बहारदार असे हरि भजन सादर केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी युवा नेते यशराजे साळुंखे-पाटील,श्री. अरुण भाऊ घुले-सरकार,श्री.आप्पासाहेब दादा देशमुख,श्री. साहेबरावदादा पाटील,श्री.अनिल साळुंखे(चेअरमन)श्री.विलास घुले सर,श्री.बसवेश्वर गयाळी,श्री.बंडू सुतार,श्री.प्रवीण साळुंखे श्री.राजू सरवदे गुरुजी श्री.प्रशांत देशमुख सर,श्री.रमेशआप्पा साळुंखे,श्री.अशोक भोसले,श्री.दत्ता बर्वे,श्री.संजय साळुंखे,श्री. विश्वजीत देशमुख गुरुजी,श्री.आनंदा वाघमारे,श्री.लालासाहेब देशमुख,श्री.बाबासो देशमुख,श्री.रामराव देशमुख,श्री.प्रकाश गोरे,श्री.रणजीत देशमुख,श्री.बंडू साळुंखे,श्री.प्रणील कोडग,श्री. मनोज धुमाळ,श्री.शंकर देशमुख,श्री.बापू बंडगर तसेच देशमुख परिवाराचे सर्व नातेवाईक,महिला उपस्थित होते.