रोटरी क्लब सांगोला यांच्यावतीने एकल महिलांना शेळी वाटप..

रोटरी क्लब सांगोला यांनी यापूर्वी दोन शेळ्या दिलेल्या आहेत आणि आज पुन्हा दोन शेळ्या एकल महिलांना देण्यात आल्या.या महिलांना आपल्या संसारात मदत व्हावी म्हणून ही शेळी भेट देण्यात आली.
रोटरी क्लब सांगोला यांच्या शेळी प्रकल्पाची संकल्पना अशी आहे की, आज लाभार्थीला शेळी दिली तर त्यांनी येणाऱ्या दोन वर्षात तयार झालेली एक शेळी पुन्हा रोटरीकडे द्यावी आणि रोटरीने पुन्हा अशाच एका लाभार्थ्याला ती शेळी वितरित करावी. म्हणजे ही चेन अशाचप्रकारे सुरू राहील. या लाभार्थ्यांनी एकदाच शेळी द्यायची आहे पुन्हा पुन्हा द्यावी लागणार नाही.
या महिलांना रोजगार करता करता संसारात हातभार लागावा यासाठी हा प्रकल्प सुरू आहे. आजच्या या प्रकल्पात सिंधू शंकर बनकर व सावित्री दादासो फुले या दोघींना शेळ्या देण्यात आल्या. या शेळ्यांसाठी डॉक्टर प्रभाकर माळी व अनुसे गुरुजी यांनी ही मदत केली.
रोटरी क्लब सांगोला यांनी शिक्षकांना पुरस्कार देताना शिक्षकांसमोर एक सामाजिक प्रकल्प सुद्धा आपण करावा अशी विनंती केली होती त्या विनंतीला मान देऊन वाढेगाव ( सांडस मळा ) या ठिकाणी कार्यरत शिक्षक अनुसे गुरुजी यांनी आजची शेळी देऊन प्रकल्पाला मदत केली.
अनुसे गुरुजींचे वैशिष्ट्य म्हणजे सांडस मळा या ठिकाणी जी प्राथमिक शाळा आहे ती अगदी बंद पडण्याच्या अवस्थेत आली होती. विद्यार्थी संख्या फक्त पाच वर आली होती.परंतु या शाळेस वैभव प्राप्त करून देण्याचे काम गुरुजींनी केले.
शाळेला कंपाऊंड केले, शाळेमध्ये संगणक आणला, लायब्ररी केली, शाळेची पटसंख्या 5 वरून 25 केली.सर्व विद्यार्थ्यांना लेखन, वाचन, गणित या सर्व क्षमता प्राप्त झालेल्या आहेत. बरेच विद्यार्थी संगणक चालवतात. अशाप्रकारे यांनी केलेली प्रगती बघून रोटरी क्लबने याच वर्षी त्यांना नेशन बिल्डर अवार्ड दिलेले होते.
आजच्या या कार्यक्रमासाठी रो.डॉ. प्रभाकर माळी रो.मोहन मस्के, रो.दीपक चोथे रो. शरणप्पा हळळीसागर रो. विकास देशपांडे रो. विजय म्हेत्रे रोटरी अध्यक्ष साजिकराव पाटील त्याबरोबरच ग्रामस्थ भाऊसाहेब फुले, सिताराम फुले, सिद्धेश्वर फुले, यश फुले, रमेश फुले, नितीन फुले, काकासो फुले, गजानन फुले, दाजी फुले, मधुकर फुले, अविनाश फुले, सावता शंकर राऊत, चंद्रकांत सागर, सौ छाया फुले, सौ सरुबाई फुले, सो केशर फुले सौ सुमन फुले तसेच लाभार्थी सिंधू शंकर बनकर व सावित्री दादासो फुले हजर होते.
सर्वांनी रोटरीच्या या उपक्रमाचे कौतुक केले व पुढे लाभार्थी मिळवून प्रकल्प पुढे चालत राहणार आहे. याबद्दल समाधान व्यक्त केले.