क्रांतीज्योती महिला नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

सांगोला (प्रतिनिधी):- क्रांतीज्योती महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगोला-बनकरवाडी या पतसंस्थेची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मोठ्या उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात सांगोला येथे पार पडली.

सभेच्या सुरुवातीला पतसंस्थेच्या चेअरमन सौ.भाग्यश्री रामचंद्र बनकर व सर्व संचालिकांनी प्रतिमा पूजन करून सभेला सुरुवात केली. यावेळी पतसंस्थेच्या सर्व संचालिका श्रीमती निलाबाई नारायण अनंतकवळी, सौ.सुशीला संभाजी बनकर, सौ.दिपाली चंद्रकांत बनकर, सौ.राणी उमेश बनकर,  सौ.रेश्मा बाळासो बनकर, सौ.गीता सतीश खडतरे, सौ.वैष्णवी साताप्पा शिंदे, सौ.अंकिता राहुल बनकर, तज्ञ संचालिका सौ.तृप्ती सचिन बनकर, सल्लागार सौ.अ‍ॅड.चैत्रजा विक्रांत बनकर, सल्लागार सौ.मनीषा उत्तम बनकर, सौ.मनीषा सदाशिव बनकर तसेच संस्थेचे संस्थापक श्री.रामचंद्रअण्णा बनकर, मार्गदर्शक सीए.उत्तम बनकर, उद्योजक श्री.एस.टी.बनकर उपस्थित होते.
प्रास्ताविक श्री.सोमनाथ बनकर सर यांनी केले. त्यानंतर संस्थेचे सचिव व्यवस्थापक श्री.गणेश नारायण अनंतकवळी (माळी) यांनी पतसंस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले.

संस्थापक श्री.रामचंद्रअण्णा बनकर यांनी आपल्या मनोगतांमध्ये संस्थेच्या कार्याविषयी तसेच संस्थेच्या नवीन शाखा विस्ताराबाबत संस्था व्यवसाय वृद्धी करता व वसुली करता नवीन चार चाकी गाडी खरेदी करणे बाबत माहिती दिली. यावेळी संस्थेचे रेग्युलर कर्जधारकांना व्याजात मिळालेली 1 टक्के सवलत चेक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच दहावी व बारावी परीक्षांमध्ये तसेच अन्य परीक्षांमध्ये मेरिटमध्ये आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

संस्थेच्या कार्याचा वृत्तांत संस्थेचे मार्गदर्शक सीए.श्री उत्तम दत्तू बनकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.

संस्थेच्या चेअरमन सौ.भाग्यश्री रामचंद्र बनकर यांनी संस्थेतर्फे महिलांसाठी राबवले जाणारे उपक्रम तसेच चालू आर्थिक वर्षात सभासदांना दिल्या जाणार्‍या लाभांश वाटपाची माहिती दिली.यावेळी श्री.तानाजी केदार गुरुजी, श्री.विष्णू गोडसे सर, उद्योजक श्री.एस.टी.बनकर, ऑडिटर श्री.मणेरी, श्रीपती आदलिंगे, श्री.अच्युत फुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी श्री.अमर गोसावी, कोळा अर्बनचे श्री.शिंदे, श्री.माळी, माऊली ग्रामीणचे व्यवस्थापक श्री.चंद्रकांत गोडसे, श्री.सचिन बनकर सर, श्री.चंद्रकांत बनकर यांच्यासह संस्थेचे सर्व बचत प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे व सभासदांचे आभार अ‍ॅड.चैत्रजा विक्रांत बनकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button