सौ.रत्नप्रभा माळी योग गुरु पुरस्काराने सन्मानित

सांगोला:- केंद्रीय संचार ब्युरो माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार व जिल्हा प्रशासन सोलापूर आणि पतंजली योग समिती व योगाच्या विविध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 21 जून जागतिक योगा दिनानिमित्त पतंजली योग समितीच्या सोलापूर जिल्हा महिला संरक्षक सौ. रत्नप्रभा किसन माळी यांच्या योगाच्या क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून त्यांना माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून आदर्श योग गुरू पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार मॅडम व केंद्रीय संचार ब्युरो अंकुश चव्हाण यांच्या हस्ते नुकताच सोलापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदान करण्यात आला. तसेच मंगळवेढा येथील संतोष दुधाळ सर यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबद्दल पतंजली परिवार सांगोला यांच्या वतीने रत्नप्रभाताई किसन माळी व संतोष दुधाळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील पतंजली योग समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ. रत्नप्रभाताई माळी यांचे सांगोला अर्बन बँकेचे संस्थापक चेअरमन डॉ.प्रभाकर माळी यांच्यासह सांगोला तालुक्यातील योगप्रेमी नागरिकांकडून अभिनंदन होत आहे