सावे माध्यमिक विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.

सावे माध्यमिक विद्यालयात सर्वगुण सदगुणांचा उपासक, लोकराजा, स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी, बहुजनांच्या उद्धारासाठी, गरिबांच्या कल्याणासाठी क्रांतिकारक व समाज हिताचा निर्णय घेणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयातील वरिष्ठ लिपिक श्री शेंडगे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांविषयी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा विद्यालयातील सहशिक्षक श्री बर्गे सर यांनी सांगितला. त्यांच्या मनोगतातून छत्रपती शाहू महाराज हे गोरगरिबांचा व दिनदलितांचा राजा होता. विद्वानांचा चाहता होता ,कलावंताचा त्राता होता, समाज सुधारकांचा दाता होता तसेच जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविणार नाहीत अशा पालकांना एक रुपये दंड ठोठावणारा राजा, कला, संस्कृती क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा, अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववाद यावर प्रहार करणारा राजा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करणारा राजा असे त्यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शाहू महाराजांविषयी सांगितले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.