sangolaeducational

चौगुले सायन्स क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

HTML img Tag Simply Easy Learning    

  सांगोला तालुक्यात नावलौकिक मिळविलेल्या प्रा. संजय चौगुले यांच्या चौगुले सायन्स क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मंगळवार दिनांक 25 जून रोजी मोठ्या उत्साही वातावरणात आनंद लॉन्स, सांगोला येथे संपन्न झाला.

    चौगुले सायन्स क्लासेसमधील MHT-CET या परीक्षेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आनंद लॉन्स सांगोला येथे प्रा. डॉ. बी.पी. रोंगे यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला होता.     व्यासपीठावर प्रा. श्री. मोहन मस्के, प्रा. निवास येलपले, प्रा. डॉ. साजिकराव पाटील, प्रा. बी. टी. चौगुले, प्रा. प्रवीण उबाळे , श्री महेश कुलकर्णी, श्री दत्तात्रय जांभळे उपस्थित होते.
यावेळी प्रा. डॉ. बी.पी. रोंगे सर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे व प्रा. संजय चौगुले यांचे अभिनंदन करून क्लासेसच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
       याप्रसंगी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आवडीचे क्षेत्र न निवडता भविष्य उज्वल करणारे करिअर निवडावे असे सांगितले. कितीही कठीण परिस्थिती आली तरी परिस्थितीला दोष न देता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत पुढे जावे असे सांगितले.    मोबाईल, सोशल मीडिया यांना बळी न पडता विद्यार्थ्यांनी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करावेत असे सांगितले. याप्रसंगी त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.जर तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही ध्येयवेडेपणा करून यशाच्या शिखरावरती पोहोचू शकतो हे पटवून सांगितले.
चौगुले सायन्स क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे वाटते तितके सोपे नाही यासाठी प्रचंड प्रामाणिक मेहनत लागते, हे सांगून क्लासच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तसेच महाराष्ट्र राज्य स्टेट कॉमन टेस्ट सेल कडून एप्रिल व मे 2024 मध्ये घेण्यात आलेल्या MHT-CET परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
   यामध्ये ऋषिकेश यादवने 99.71 परसेंटाइल गुण घेऊन सांगोला तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला, तसेच गौरी रोडगे हिने बायोलॉजी विषयामध्ये 100 परसेंटाइल गुण घेऊन महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवला, तसेच साक्षी चौगुले 99.52 परसेंटाइल शुभम लोकरे 99.51 परसेंटाइल, वैभवी इंगोले 97.96 परसेंटाइल, आदर्श  खुळपे 97.50 परसेंटाइल, पुनम लेंडवे 97.39 परसेंटाइल, तन्वी शिंदे 97.39 परसेंटाइल,  वैभव यादव 97.12 परसेंटाइल, सायली शिंदे 96.98 परसेंटाइल, गणेश देशमुख 96.51परसेंटाइल, अंजली करपे 96.34 परसेंटाइल, दादा गरंडे 96.21 परसेंटाइल, अनुराधा गायकवाड 96.06 परसेंटाइल, अमृता पाटील 96.03 परसेंटाइल, अक्षदा सोळशे 95.64 परसेंटाइल, वैष्णवी मेटकरी 95.40 परसेंटाइल, सुजान गायकवाड 95.40 परसेंटाइल, सायली ढोले 95.37 परसेंटाइल,अनुश्री शेंडे 95.14 परसेंटाइल,सानिका भोसले 95.11 परसेंटाइल, भक्ती राऊत 94.90 परसेंटाइल, संदेश स्वामी 94.82 परसेंटाइल, मृणाली अडसूळ 94.50 परसेंटाइल, अर्शिया खतीब 94.30 परसेंटाइल, सृष्टी आर. गायकवाड 93.84 परसेंटाइल, रणवीर पाटील 93.75 परसेंटाइल, ऋषिकेश कारंडे 93.71 परसेंटाइल, साक्षी नीलकंठ 93.61 परसेंटाइल, सोहम बुरुंगले 93.58 परसेंटाइल, वैभव काटे 93.33 परसेंटाइल, शुभम होळकर 93.08 परसेंटाइल, पुजा एरंडे 92.71 परसेंटाइल, आयुष कांबळे 92.63 परसेंटाइल, प्रियाली गायकवाड 92.62 परसेंटाइल, सई पोरे 92.52  परसेंटाइल, तन्वी आडसूळ 92.30 परसेंटाइल, करण क्षीरसागर 92.29  परसेंटाइल, प्रतीक्षा मिसाळ 91.84 परसेंटाइल, प्रथमेश नागणे 91.81 परसेंटाइल, श्वेता केदार 91.69 परसेंटाइल, प्रफुल्ल पवार 91.20 परसेंटाइल, ईशान बेले 90.79  परसेंटाइल, सानिका पवार 90.47. परसेंटाइल, आदिती येलपले 90.38. परसेंटाइल, सानिका जगधने 90.22 परसेंटाइल, अनम अत्तार 89.85 परसेंटाइल, वैष्णवी तोरडमल 89.74 परसेंटाइल, अभय लाटणे 89.67 परसेंटाइल, हर्षदा केदार 89.56  परसेंटाइल, प्रणव गावडे 88.51 परसेंटाइल,  आर्या परदेशी 87.90 परसेंटाइल, श्रेयश पाटील 87.44 परसेंटाइल, सृष्टी कोडग 87.11 परसेंटाइल, वृषाली बनकर 87.11 परसेंटाइल, अथर्व खुळपे 86.97 परसेंटाइल, साहिल विभूते 86.87 परसेंटाइल, अंजली रास्ते 86.82 परसेंटाइल, अतेश शिंदे 86.67 परसेंटाइल, शिफा तांबोळी 86.13 परसेंटाइल, वैभव आवताडे 86.12 परसेंटाइल, अजित बंडगर 85.26 परसेंटाइल, प्रीती लेंडवे 85.11 परसेंटाइल, सुहानी गावडे 85.00  परसेंटाइल, गजानन पाटोळे 84.30  परसेंटाइल, साहिल मेटकरी 84.02 परसेंटाइल, हर्षदा यमगर 82.72 परसेंटाइल, वैशाली केदार 83.32 परसेंटाइल, विशाखा वाघ 83.31  परसेंटाइल, सानिका बंडगर 82.58 परसेंटाइल, झाडबुके पार्थ 82.17  परसेंटाइल, पायल कोळेकर 81.91 परसेंटाइल, सार्थक कोळसे- पाटील 81.78 परसेंटाइल, हर्षद तंडे 81.44  परसेंटाइल, वैष्णवी कुलकर्णी 81.45 परसेंटाइल, रोहित कुकाटे 81.04 परसेंटाइल, सानिका तेली 80.70 परसेंटाइल, प्रज्वल गायकवाड 80.59परसेंटाइल, तसेच इयत्ता दहावी मधील पाडवी जयश्री 95.60%,  बंडगर मोहिनी 95.40%, केदार मंजुषा 94.00%,  मोटकुळे आर्या 92.80%,  मोरे वैष्णवी 92.00%, भगत सृष्टी 90.20%, कर्चे पायल 88.20%, देवकते स्नेहल 88.20%, शिंदे प्रणिती 87.60%, मनेरी महेक 87.40%, कवडे आर्यन 87.40%, कोटी सत्यम 84.00%, बाबर श्रुती 82.60% या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
   तसेच प्रा. निवास येलपले, प्रा. डॉ. साजिकराव पाटील व प्रा. श्री मोहन मस्के सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उत्कृष्ट निकालाबद्दल प्रा. संजय चौगुले सरांचे अभिनंदन करून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
         कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली यानंतर मान्यवरांचा सत्कार क्लासेसच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक प्रा. बी. टी.चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला.
    मान्यवरांचा परिचय व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिता माधुरी जाधव यांनी केले व आभार प्रा. मल्हारी बनसोडे यांनी मानले.
  कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा. कृष्णा घुंबरे, श्री. सोमनाथ गायकवाड, प्रा. कुलदीप जाधव, अक्षय बोत्रे व फोटोग्राफर अरुण ऐवळे यांनी परिश्रम घेतले.
HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!