*जीवनातील सकारात्मक दृष्टिकोन यशाचा मार्ग दाखवतो.- संस्था अध्यक्ष डॉ. अनिकेत देशमुख

जीवनातील सकारात्मक दृष्टिकोन यशाचा मार्ग दाखवतो.- संस्था अध्यक्ष डॉ. अनिकेत देशमुख
*न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये MHT-CET परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न*
न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज सांगोला मध्ये एमएचटी-सीईटी 2024 या परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्था अध्यक्ष डॉ. अनिकेत भैया देशमुख होते,तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर होते.
सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुणे संस्था अध्यक्ष डॉ. अनिकेत देशमुख यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले संस्था अध्यक्ष डॉ. अनिकेत देशमुख व कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला चे प्राचार्य प्रा केशव माने, संस्था सदस्य प्रा. डॉ.अशोक शिंदे, प्रा. दीपक खटकाळे, प्रा जयंत जानकर, उपमुख्याध्यापक प्रा संजय शिंगाडे, उपप्राचार्य प्रा संतोष जाधव, पर्यवेक्षक श्री तानाजी सूर्यगंध सर,श्री तातोबा इमडे सर, श्री दशरथ जाधव सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा मिलिंद पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
आपल्या मार्गदर्शन पर मनोगता मध्ये बोलत असताना संस्था अध्यक्ष डॉ. अनिकेत देशमुख यांनी सर्वप्रथम सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या कॉलेजमध्ये या कॉलेजची गणना केली जाते. फक्त संख्यात्मक वाढ नसून गुणात्मकहि वाढ असल्याचे या एमएचटी-सीईटी 2024 परीक्षेमधील निकालावरून स्पष्ट होते. यामध्ये 32 हून अधिक विद्यार्थ्यांनी 90 परसेंटाइल पेक्षा जास्त गुण मिळवून कॉलेजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे, तरच आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ, असे सांगितले. यावेळी स्वतः शिक्षण घेत असताना आलेले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. इयत्ता दहावी बारावी म्हणजे संपूर्ण शिक्षण नव्हे तर ज्ञानाचे भांडार मिळवण्यासाठी सतत चौकस बुद्धीने व सकारात्मकतेने राहिले पाहिजे. तसेच मोबाईलचा शैक्षणिक कार्यासाठी व समाज हितासाठी वापर केला पाहिजे, असे सांगितले. शिक्षकांनीही आपल्या विषयातील ज्ञान वृद्धिंगत करण्याकडे लक्ष दिले पाहिजे असे सांगितले.
आपल्या अध्यक्षीय मनोगत मध्ये बोलत असताना संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर यांनी या संस्थेच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थी घडवणारी, विद्यार्थी हित जोपासणारी, विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी सदैव प्रयत्नशील असणारी अशी शाळा आहे, असे सांगितले. इथून पुढील काळामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी लातूरला, पुण्याला, कोल्हापूरला जावे लागणार नाही, यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्नशील राहू असे सांगून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
32 विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटी 2024 या परीक्षेमध्ये 90 परसेंटाइल पेक्षा जास्त गुण मिळवले.या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये यादव ऋषिकेश अण्णासाहेब यांनी 99.71% परसेंटाइल, शिंदे दिपाली वसंत हिने 99.44 पर्सेंटाइल, गाडेकर विराज सुरेश यांनी 99.25 पर्सेंटाइल, केदार सानिका शिवाजी हिने 98.88 पर्सेंटाइल, साळुंखे श्रेया अशोक हिने 98.59 परसेंटाइल, मुजावर पनिष जाकीर याने 97.58 परसेंटाइल, यादव वैभव सुरेश याने 97.12 परसेंटाइल, शिंदे तनवी तानाजी हिने 97.39 पर्सेंटाइल, शिंदे सायली संतोष हिने 96.58 पर्सेंटाइल, देशमुख गणेश दत्तात्रय याने 96.51 परसेंटाइल, गायकवाड अनुराधा शरद हिने 96.06 पर्सेंटाइल, बुरुंगले काजल भारत हिने 95.73 परसेंटाइल, सोळसे अक्षदा नारायण हिने 95.64 पर्सेंटाइल, गायकवाड सुजाण सुरेश याने 95.40 पर्सेंटाइल, अडसूळ मारुती दादासो याने 94.50 पर्सेंटाइल, खतीब रसिया अल्ताफ हिने 94.30 परसेंटाईल, गायकवाड सृष्टी रावसाहेब हिने 93.84 परसेंटाइल, दबडे कल्पिता जगन्नाथ हिने 93.82 परसेंटाइल, नीलकंठ साक्षी राजेंद्र हिने 93.61 पर्सेंटाइल, बुरुंगले सोहम शुभम याने 93.58 पर्सेंटाइल, काटे वैभव आबासाहेब याने 93.33 पर्सेंटाइल, होळकर शुभम संपतराव याने 93.08 परसेंटाइल, एरंडे पूजा बाळासाहेब हिने 92.71 परसेंटाइल, गायकवाड प्रियाली अंबादास हिने 92.62 परसेंटाइल, पोरे सई दत्तात्रय हिने 92.52 परसेंटाइल, क्षीरसागर करण नंदकुमार यांनी 92.29 पर्सेंटाइल, सरगर वर्षाराणी हैबत हिने 92.26 परसेंटाइल, इंगळे सुरज संजय याने 92.09 परसेंटाइल, पवार प्रफुल्ल कृष्णा याने 91.20 पर्सेंटाइल, जगताप श्रेया सुनील हिने 90.80 पर्सेंटाइल, पवार सानिका संजय हिने 90.47 परसेंटाइल, बाबर रोहिणी वामन हिने 90.47 परसेंटाइल गुण मिळवत यश संपादन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांमधून सानिका केदर ऋषिकेश यादव रोहिणी बाबर व श्रेया साळुंखे हिने तर पालकांमधून श्री संतोष शिंदे सर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सौ इंदिरा येडगे मॅडम, गुणवंत विद्यार्थी यादी वाचन प्रा सौ माने एस एम मॅडम, प्रास्ताविक प्रा सौ मिसाळ एन. डी.मॅडम यांनी तर आभार प्रा बोराडे एन व्ही यांनी केले.