महाराष्ट्र
फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये कळी उमलताना समुपदेशन कार्यशाळा

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये कळी उमलताना समुपदेशन कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.सुप्रिया लवटे, प्राचार्य श्री सिकंदर पाटील,ए.ओ.वर्षा कोळेकर, सुपरवायझर सौ वनिता बाबर हे लाभले. इयत्ता पाचवी ते दहावीच्या मुलींच्या शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलाचे ज्ञान मुलींना असणे आवश्यक आहे.
स्त्रीरोगतज्ञ डॉ.सुप्रिया लवटे यांनी विद्यार्थीनींबरोबर संवाद साधत मुलींच्या मनातील प्रश्नांची उत्तरे दिली. मासिक ऋतू म्हणजे काय? तसेच मासिक ऋतू कसा ओळखावा. त्या काळात शरीरात होणारे बदल, शरीराची काळजी व आरोग्य यांचेही महत्व सांगितले. हा अनुभव मुलींसाठी वेगळा आणि मनातील प्रश्नांचा उकल करणार होता. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणाल राऊत यांनी केले.