maharashtracrime

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 76 लाख 43 हजार रुपये किंमतीची निकृष्ट सुपारी जप्त

HTML img Tag Simply Easy Learning    

अन्न व औषध प्रशासनाला   दिनांक 27 जून 2024  रोजी विशेष भरारी पथकातील अन्न सुरक्षा अधिकारी श्री. मंगेश लवटे यांना मिळालेल्या     गुप्त माहितीच्या आधारे सोलापूर येथील मार्केट यार्ड चौकामध्ये अशोक लेलंड वाहन क्र. KA-१४, C- ७५१५, KA-१४, c-०८५० व KA-१४, c-४६१९ या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये रंगमिश्रीत व किटकबाधीत सुपारीची वाहतुक होत असल्याचे आढळून आले.

सदर ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रेणुका पाटील यांनी किटकबाधीत व रंग मिश्रीत सुपारी या अन्न पदार्थाचे नमुने घेऊन उर्वरित ७३ हजार ४९४ किलो  किंमत  ७६ लाख ४३ हजार ३७ रुपयाचा  साठा कमी दर्जाच्या संशयावरुन जप्त करुन ताब्यात घेतला असून, सदर प्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत पुढील कारवाई सुरु आहे.

सदरची कारवाई विशेष भरारी पथकाचे सहायक आयुक्त श्री. साहेब देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी श्री. मंगेश लवटे, उमेश भुसे व श्रीमती रेणुका पाटील तसेच नमुना सहाय्यक श्रीशैल हिटनळ्ळी, यांच्या पथकाने केली

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!