maharashtrapolitical

कार्यकर्त्यांच्या मनात आहे तेच माझ्याही मनात

मा.आम दिपकआबांची कार्यकर्त्यांना ग्वाही

HTML img Tag Simply Easy Learning    

गेली ३५ वर्षे राजकीय जीवनात मी सांगेल तो शब्द माझ्या कार्यकर्त्यांनी प्रमाण मानला आहे. मी सुद्धा वरिष्ठांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी माझी राजकीय कारकीर्द पणाला लावली. मात्र यापुढील काळात माझ्या शब्दावर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली.

 

शुक्रवार दि २८ जून रोजी सांगोला येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता संवाद बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

आगामी निवडणुकीच्या तोंडावर सांगोला येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आयोजित केलेल्या कार्यकर्ता संवाद बैठकीस जाहीर सभेचे स्वरूप प्राप्त झाले. या बैठकीस चारुशीला काटकर, मधुमती साळुंखे, पंढरपूर तालुक्याचे युवा नेते समाधान काळे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजी पाटील, माजी उपनगराध्यक्ष शिवाजी बनकर, शिवाजी कोळेकर, आर डी पवार, शहाजी साळुंखे, अनिल नागटिळक, विलास देठे, राजाभाऊ माने, नवनाथ माने, सुनील पाटील, बापू जाधव, संतोष साळुंखे, डॉ. सुधाकर महारनवर, अनंता घालमे, पिनु जाधव, चंद्रकांत शिंदे, आलमगीर मुल्ला, अनिल खडतरे, सतीश काशीद, विजय राऊत, चंदन होनराव, राम बाबर, चंद्रकांत कारंडे, सुनील साळुंखे, विजय पवार, चंद्रकांत चौगुले, अनिल मोटे, दिलीप मोटे, महादेव कांबळे, संतोष पाटील, शोभाताई खटकाळे, सदाशिव साळुंखे, सखुताई वाघमारे, शुभांगी पाटील, किसन गायकवाड, योगेश खटकाळे, जयवंत नागने, वसंत जरे, संभाजी हरिहर, रामदादा मिसाळ, राजाराम घागरे, विश्वनाथ चव्हाण, बाबुराव नागने, हरी सरगर, अजित गोडसे, अमोल सुरवसे आदी सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना मा आम. दिपकआबा म्हणाले, सांगोला तालुक्यातील खेडोपाड्यातील जनतेच्या अडचणी जाणून घेण्यासाठी लवकरच गावभेट दौरा आयोजित करत आहे. या दौऱ्यात सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून त्या समस्या गावातच सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शिवाय २५ जून ते २४ जुलै दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जास्तीत जास्त नवीन मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे असे आवाहनही यावेळी माजी आमदार दिपकआबांनी कार्यकर्त्यांना केले. दरम्यान या कार्यकर्ता संवाद बैठकीत उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी 35 वर्ष सांगोला तालुक्यातील जनतेच्या सेवेत अविरतपणे काम करणाऱ्या मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांना विधानसभेची निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला कार्यकर्त्यांना उत्तर देताना मा. आम. दिपकआबा म्हणाले, गेली 35 वर्ष मी जो आदेश देईल तो कोणताही प्रतिप्रश्न न करता प्रामाणिकपणे पाळणारे कार्यकर्ते हेच माझे राजकीय भांडवल आहेत या पुढील काळात कार्यकर्त्यांना मी कोणताही आदेश देणार नाही तर कार्यकर्ते जी भूमिका ठरवतील तो निर्णय घेणार आहे जे कार्यकर्त्यांच्या मनात आहे तेच माझ्याही मनात आहे. कार्यकर्त्यांनी आज पासूनच आगामी रणसंग्राम डोळ्यासमोर ठेवून कामाला लागावे असे आवाहनही शेवटी मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.
या कार्यकर्ता संवाद बैठकीत युवा नेते समाधान काळे शिवाजी बनकर आर डी पवार सर शिवाजी कोळेकर चंद्रकांत चौगुले महादेव कांबळे संभाजी हरीहर अक्षय चोरमुले राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष सखुबाई वाघमारे आधी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक संपूर्ण ताकदीनिशी लढवावी अशी आग्रही मागणी केली.

चौकट ;

१) जे तुमच्या मनात आहे तेच होणार..!

कार्यकर्ता संवाद बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आबांनी आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढावी अशी मागणी केली. यावर मा. आम. दिपकआबांनी सूचक वक्तव्य करत मी एका राजकीय पक्षाचा जबाबदार पदाधिकारी आहे. परंतु, जे तुमच्या मनात आहे तेच येणाऱ्या निवडणुकीत होईल असे सांगून कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.

 

 

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!