sangolamaharashtra

कृषी केंद्र आगीच्या भक्ष्यस्थानी; अंदाजे ७० लाख रुपयाचे नुकसान

HTML img Tag Simply Easy Learning    

सांगोला – वीजेच्या बोर्डात शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या भीषण कृषी केंद्रातील महागडे औषधे, बी बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खते,संगणक सीसीटीव्ही कॅमेरे आदी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने तरुण उद्योजकाचे सुमारे ७० लाख २८ हजार रुपयाचे नुकसान झाले.ही घटना बुधवारी मध्यरात्री १ च्या सुमारास मटन मार्केट शेजारील शंभूराजे ॲग्रो एजन्सीज याठिकाणी घडली. याबाबत, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

बागलवाडी ता सांगोला येथील तरुण उद्योजक विशाल चेळकर यांनी व्याजाने पैसे काढून सांगोला येथील नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटर मध्ये विशाल राजे ॲग्रो एजन्सी या नावाने सहा महिन्यापूर्वी कृषी केंद्र चालू केले होते. सध्या खरीप हंगाम सुरू असल्यामुळे त्यांनी दुकानात रासायनिक खते औषधे बी बियाणे कीटकनाशके असे शेतीसाठी लागणारा मालाचा स्टॉक करून ठेवला होता बुधवारी दिवसभर दुकान चालवून नेहमी प्रमाणे दुकान कुलूप बंद करून विशाल चेळकर घराकडे परतला दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास दुकानातून धूर येत असल्याचे पाहून अज्ञात व्यक्तीने बोर्ड वरील मोबाईल नंबर वरून विशाल चेळकर यांच्याशी संपर्क साधून दुकानात आग लागल्याचे सांगितले त्याने तातडीने घटनास्थळी धाव घेवून नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाला कळविले सुमारे एक तासाच्या परिश्रमातून आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन बंबाला यश आले मात्र या भीषण आगीत ॲग्रो एजन्सीच्या दुकानातील शेती उपयोगी सर्व माल जळून खाक झाला होता गाव कामगार तलाठी कुमार रवी राजवाडे यांनी पंचनामा केला आहे.

घटनास्थळी तहसीलदार संतोष कणसे, शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी करून तहसीलदार सांगोला ,वीज वितरण कंपनी यांच्याशी संपर्क साधून नुकसानीचा तातडीने पंचनामा करण्याची विनंती केली.सांगोला तालुका खते औषधे बी बियाणे विक्रेत्ये संघटनेच्या वतीने कडून शंभुराजे कृषी केंद्र चालक विशाल चेळकर यास तातडीची आर्थिक मदत केली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष सत्यवान घाटुळे , उपाध्यक्ष रमेश अनुसे , माजी सरपंच तुकाराम आळसुंदकर , योगेश कुलकर्णी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!