आदर्श शिक्षक समितीचा 30 जून रोजी राज्यव्यापी संभाजीनगर आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा!
१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करा, सुधारित नव्हे! तसेच नवीन संचमान्यतेचा शासननिर्णय रद्द करा.....

राज्यातील १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षक कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, सुधारित नव्हे .स्थानिक स्वराज्य संस्था मधील शिक्षकांचे रिक्त पदे तात्काळ भरा,शालेय पोषण आहार स्वयंपाकी मदतनीस ला सरसकट दहा हजार रुपये मानधन द्यावे. विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक पदोन्नतीच्या प्रक्रिया पूर्ण करा आशा विविध मागण्यांसाठी आदर्श शिक्षक समितीच्या वतीने छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर रविवारी 30 जून रोजी दुपारी एक वाजता मोर्चा काढून राज्य सरकार ला निवेदन सादर करण्यात येणार आहेत.
मोर्च्याच्या निमित्ताने सरकारकडे गणवेश बाबत कीलिस्ट प्रोसेस रद्द करावी पूर्वीप्रमाणेच गणवेश खरेदी करावी.20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नये.शालेय पोषण आहार सेविकांना दरमहा दहा हजार रुपये विनाअट मानधन द्यावे.राज्यातील विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख , पदवीधर शिक्षक, माध्यमिक शिक्षक पदोन्नतीचे पदे त्वरित भरावी.बदली धोरण सर्व घटकांना समान न्याय देणारे असावे.बदल्यात अनियमितता गैरव्यवहार करणारे अधिकारी कर्मचारी कठोर कारवाई करावी.सर्व अशैक्षणिक कामे बंद करावी.आश्वाशीत प्रगती योजना लागू करावी.शिक्षकांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करावी.वस्तीशाळा शिक्षक यांची नियुक्त्या दिनांक पासून सेवा ग्राह्य धरावी.शाळेची लाईट बिल भरण्यासाठी निधी उपलब्ध करावा.खिचडी शिजविण्यासाठीचे काम स्वतंत्र यंत्रणा ला देण्यात यावे.सरसगट आठवी पर्यंत शाळेला स्वतंत्र मुख्याध्यापक देण्यात यावा.संगणक ऑपरेटर्स व शिपाई देण्यात यावा. पहिली ते आठवीपर्यंत शाळांमध्ये कला निदेशक नेमण्यात यावेत. सातवा वेतन आयोगाच्या सर्व वेतन तफावती दूर करण्यात याव्यात.रजा रोखीकरण लाभ जिप शिक्षकांना देण्यात यावा, प्रशाला च्या शिक्षकांसाठी बदली धोरण निश्चित करून प्रक्रिया राबविण्यात यावी, प्रशाला मधील वर्ग 2ची पदे तात्काळ भरण्यासाठी शासनाने लक्ष द्यावे अशाप्रकारे विविध मागण्यांकडे मोर्च्या च्या निमित्ताने लक्ष वेधण्यात येणार आहे, येत्या 30 जून दुपारी एक वाजता क्रांती चौक, येथून मोर्चा काढला जाणार असून पैठण गेट, मार्ग विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चाची सांगता होणार आहेत,
आयुक्त कार्यालय मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, शालेय शिक्षण।मंत्री, मुख्य सचिव व प्रधान सचिव यांना निवेदन सादर करण्यात येणार आहेत ,जिल्ह्यातील शिक्षकांनी आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आदर्श शिक्षक समितीच्या वतीने राज्य नेते अंकुश काळे जिल्हा नेते राजकुमार राऊत जिल्हाध्यक्ष संजीव चाफाकरंडे ,जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खुर्द,जिल्हा कार्यकारी अध्यक्ष,दिपक काळे, शिक्षक नेते सूर्यकांत व्हनमाने ,विलास शिराळ ,आबासाहेब टेकळे, अनिल जाधवर,धनाजी कुंभार, भिवाजी कांबळे, महादेव काशिद, विठ्ठल सावंत,अनिल खडाखडे, भाग्यश्री सातपुते, राजश्री कुबेर, मंगल काकडे, मोनालिसा नायडू, मुकुंद तांबिले, संतोष वरकुटे, श्रीमंत पाटील, रविंद्र पाटील, रमेश घंटेनरू ,झुल्फीकार मुजावर,सिध्दाराम सुतार.बि.डी.राठोड,रमेश राठोड,आबासाहेब मेटकरी,चनबसप्पा मेत्री, बाबा शेख,पोपट भोसले,इम्रान शेख,राम कोळी,विजय लोंढे,बापूसाहेब मिसाळ,वासुदेव अडसूळ,मोहन गोडसे,मधुकर कांबळे,सिध्देश्वर सावंत,विजय माळवे,सत्यवान कारंडे,सुरेश शिंदे,प्रकाश तोरणे,विजय शिंदे,संजय उंबरजे,नागेश तळे,ज्योती वाघमारे,वंदना पटणे,विशाल शिरसाटराव,यांनी केले आहे.