पी एम किसान योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित
सांगोला तालुक्यातील पश्चिम भागातील जुनोनी हातीद काळूबाळूवाडी हटकर मंगेवाडी गौडवाडी तिप्पेहळी किडबिसरी पाचेगाव बुद्रुक कोळा कोंबडवाडी कराडवाडी यासह अनेक गावातील शेतकरी पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. शिवाय ज्यांनी नावे योजनेत समाविष्ट झाली आहेत पण काही तांत्रिक कारणाने त्यांना लाभ मिळत नाही त्यांच्या अडचणी दूर कराव्यात. महसूल व कृषी विभागाने योजनेपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी कोळा जिल्हा परिषद गटाचे नेते नारायण तात्या पाटील यांनी केली आहे.पुढे बोलताना नारायण तात्या पाटील म्हणाले शेतकरी हा असून प्रशासनाने दखल घेऊन मदत करणे गरजेचे आहे अनेक शेतकरी पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचे सांगण्यात येत आहे कागदपत्रांची पूर्तता व तांत्रिक बाबींची माहिती नसल्याने ते योजनेचा लाभ त्यांना घेता येत नाही. अशा शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहेत.
महसूल विभागाने तलाठी, मंडल अधिकारी यांच्या मार्फत शेतकरी शोधावेत. शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे मिळण्यासाठी सरळ सेवा चालू केली आहे. शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. एकही शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे नारायण तात्या पाटील यांनी शेवटी सांगितले…