सांगोला :-स्व गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांचे स्मारक सभागृह आवारात उभा करण्याचा ठराव या पुर्वी झालेला असुन…सदर स्मारक ताबडतोब उभे करण्यासाठी आज महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष मा.ना.राहुलजी नार्वेकर साहेब यांची आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी भेट घेत स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख साहेब यांचे विधिमंडळाच्या आवारामध्ये स्मारक उभारण्याबाबत चे पत्र देण्यात आले.
स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचा राजकीय प्रवास पुढील पिढीला अवगत व्हावा यासाठी हे स्मारक लवकरात लवकर उभारण्यात येईल असे आश्वासन विधानसभेचे अध्यक्ष मा.ना. राहुलजी नार्वेकर यांनी देऊन यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश विधिमंडळाचे प्रधान सचिव श्री जितेंद्र भोळे यांना देण्यात आले.