विकासाच्या नावाखाली फसवणूक करणार्यांना सर्वसामान्य जनता नक्कीच जागा दाखवेल: डॉ.बाबासाहेब देशमुख

महिम येथे शेकापच्या कॉर्नरसभेस ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद; शेकापला मतदारांचा वाढतोय पाठिंबा
महिम:- ज्यांनी विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची फसवणूक करून, ज्यांनी विकासकामांमध्ये टक्केवारीचे राजकारण करुन निकृष्ठ कामे करुन विकासकामाच्या नावाखाली टक्केवारीचे राजकारण केले, अशांना आता जागा दाखवण्याची वेळ आली असून सर्वसामान्य जनता नक्कीच जागा दाखवेल असा विश्वास व्यक्त करत निवडणुकीत शिट्टी या चिन्हाला मतदान करा, असे आवाहन डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केले.
सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकासआघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ सांगोला तालुक्यातील महिम येथे प्रचार सभा संपन्न झाली. यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख बोलत होते. कॉर्नरसभेस डॉ.अनिकेत देशमुख यांच्यासह शेकाप व पुरोगामी युवक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली होती.
सांगोला मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असुन प्रचारामध्ये शेतकरी कामगार पक्षाने आघाडी घेतली असून या मतदारसंघात 11 वेळा आमदार असणारे स्व.गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी प्रस्थांपितांसमोर मोठे आव्हान उभे करुन जेरीस आणून सोडले आहे.
डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ सांगोला तालुक्यातील विविध गावामध्ये गावभेट दौरे आयोजित करण्यात आले होते. डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या शांत स्वभावामुळे, बोलण्याच्या शैलीमुळे तसेच शिट्टी चिन्हाबद्दल लोकांमध्ये असलेल्या प्रसिद्धीमुळे डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांच्या गाव भेट दौर्यांना मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी बोलताना डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख यांनी विरोधी गटाचा खरपूस समाचार घेतला.
यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले की, सांगोला मतदारसंघात अनेक विषय जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत. गेल्या 5 वर्षात सत्ता असूनही यांना पाणी तसेच रस्ते, शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न सोडवता आलेला नाही.सांगोला मतदार संघाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असून हा मतदार संघ विकसीत करण्यासाठी आणि येथील समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून डॉ.बाबासाहेब देशमुख यांची ओळख निर्माण झाली आहे. सांगोला मतदारसंघातील जनता डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणजे आशेचा किरण म्हणून पाहत आहेत. यावेळी अनेक प्रमुख मान्यवर तसेच शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.तालुक्यामध्ये निवडणुकीच्या प्रचारामध्ये शेकापने आघाडी घेतल्याचे दिसून आले.
यावेळी गद्दारांना या निवडणुकीत धडा शिकविला जाईल, टक्केवारीचे राजकारणाचा आता संपणार असून डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यानी सोशल मिडीया, फेसबुक आणि जनसंपर्क याचा वापर करुन तळागाळातील जनतेपर्यंत पोहचून डॉ.बाबासाहेब देशमुख यांना विधानसभेत पाठविण्याचा मानस मान्यवरांनी यावेळी बोलून दाखविला. सर्वांनी एकदिलाने काम करुन त्यानां ऐतिहासीक विजय मिळवून देण्याची ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली.