सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांनी फौजदारी प्रकारणाबाबतचे घोषणापत्र अर्जभरतेवेळी सादर केली आहे. यामाहितीच्या आधारे डॉ.बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्यावर केवळ आंदोलनासारख्या किरकोळ स्वरूपातील सामाजिक 2 गुन्ह्यांची नोंद आहे.
डॉ.बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांनी फौजदारी पूर्व चरित्राबद्दल प्रलंबित प्रकरणाविषयी सांगोला तालुका विधानसभा मतदार संघातील सर्व जनतेच्या माहितीसाठी नुकतीच माहिती सादर केली आहे.यामध्ये पहिल्या प्रकरण दिनांक 1 जून 2024 रोजी आयपीसी 341, 143, 149, 188 महाराष्ट्र पोलीस अॅक्ट 135 नुसार सांगोला ते जत रोड वरून जाणारे येणारे वाहनांचा मज्जाव करून बेकायदा जमाव जमवून जमाबंदी आदेशाचा तसेच रस्ता रोको, धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यास निर्बंध असताना मा.जिल्हाधिकारी सोलापुर यांच्या आदेशाचा भंग केला आहे. म्हणून सांगोला येथील फौजदारी न्यायालयात समरी केस नंबर 346/2024 ने सदरचे प्रकरण प्रलंबीत आहे.सदरचे प्रकरण कोर्टात प्रलंबीत असून अद्यापपावेतो प्ली झालेली नाही.
तर दुसर्या प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 126(2), 189(2), 190,223 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 नुसार दिनांक 23/9/2024 रोजी सांगोला पंचायत समिती कार्यालयासमोर सांगोला ते पंढरपूर जाणारी हायवे रोडवर बसून घोषणा देऊन रोड वरून जाणारे वाहनांना मज्जाव करून बेकायदा जमाव करून जमाबंदी आदेशाचा तसेच धरणे आंदोलन मोर्चा निदर्शने उपोषण करण्यास निर्बंध असताना माजी जिल्हाधिकारी सोलापुर यांचे आदेशाचा भंग केला म्हणून सांगोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून सदर प्रकरण अद्याप कोर्टात दाखल झालेले नाही.