सांगोला विद्यामंदिर मध्ये स्वच्छता अभियान संपन्न

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने भारतभर स्वच्छ भारत अभियान मोहीम राबवण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत सांगोला विद्यामंदिर मध्ये प्रशासकीय वर्ग ,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मिळून वर्गखोल्या, शिक्षक खोली तसेच आपले कार्यालय स्वच्छ केले. मैदानावरती असणारा केर -कचरा गोळा केला .मैदान स्वच्छ केले.

शासनाने राबवलेल्या या मोहिमेला प्राचार्य गंगाधर घोंगडे,उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्या शहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभीषण माने, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .शेवटी सर्वांचे आभार मानून ही मोहीम संपुष्टात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button