आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप

सांगोला ( प्रतिनिधी )- आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने सांगोला शहर व तालुक्यातील १० गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आल्या.
जुन्या- नव्या सायकल आपुलकी प्रतिष्ठानकडे जमा करण्याचे आवाहन प्रतिष्ठानकडून करण्यात आले होते. त्याला शहर व तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. आपुलकी प्रतिष्ठानकडे जमा झालेल्या सायकल दुरुस्त करून त्या गरजूना देण्यात आल्या. सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, डॉ. प्रभाकर माळी, आराध्या कलेक्शनचे सतिश गायकवाड यांच्या हस्ते व आपुलकी सदस्यांच्या उपस्थितीत रविवारी या सायकलचे वाटप करण्यात आले.
शाळेसाठी अडीच ते ३ किमी चालत जाणाऱ्या सानिका धनाजी कदम ( सांगोला), शुभम भारत मिसाळ (चिणके) यशराज दत्तात्रय मिसाळ (चिणके),साक्षी राहुल झेंडे (धायटी), श्रेयस चंद्रकांत उबाळे (धायटी), स्नेहल मारुती वाघमोडे (धायटी), सानिका सोमनाथ वाघमारे (नाझरे), आरती गणेश वाघमारे (नाझरे), गायत्री धनाजी कांबळे (नाझरे) यांना या सायकल देण्यात आल्या.
सायकल देणगीदारांचे आभार!-
स्नेहा मकरंद जवंजाळ मॅडम, भिमाशंकर पैलवान सर, संजय पैलवान गुरुजी, सतिश राऊत, श्रीकांत देशपांडे ( गोडसेवाडी ), विसापुरे सर, महेंद्र वेदपाठक, सीमा कुलकर्णी मॅडम, डॉ. संतोष पिसे, प्रा.शिवशंकर तटाळे सर, पी.आर. उबाळे (एखतपूर), निलेश नष्टे आदींनी आपल्याकडील सायकल देऊन या उपक्रमास सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आपुलकीतर्फे आभार मानण्यात आले.